Nojoto: Largest Storytelling Platform

दोन जीवांची मैफिल... ________________ सय घालीते फ

दोन जीवांची मैफिल...
________________

सय घालीते फुगडी
    घुमे पैंजणांचा नाद
      वारा नाचतो अंगणी
         तुझी देऊनिया साद

घुसमट ह्या श्वासाची
    भेट व्हावी चांदण्यात
          चंद्र दावी पायवाट
            माझ्या भरल्या डोळ्यात

येग माळून मोगरा
      तुझी चाहूल देऊनी
          रूप तुझे चांदण्यात
             जणू शुक्राची चांदणी

नको खेळ खेळू आता
    चंद्र लपला आभाळी
       दोन जीवांची मैफिल
          तेव्हा रात्र होई काळी

मन आनंदी आनंद
   तुझ्यासंगे बिलगता 
       देह प्रेमात भिजल
          रात्र चालता चालता

___________________

विठूपुत्र: अविनाश लाड

©Avinash Lad दोन जीवांची मैफिल...
दोन जीवांची मैफिल...
________________

सय घालीते फुगडी
    घुमे पैंजणांचा नाद
      वारा नाचतो अंगणी
         तुझी देऊनिया साद

घुसमट ह्या श्वासाची
    भेट व्हावी चांदण्यात
          चंद्र दावी पायवाट
            माझ्या भरल्या डोळ्यात

येग माळून मोगरा
      तुझी चाहूल देऊनी
          रूप तुझे चांदण्यात
             जणू शुक्राची चांदणी

नको खेळ खेळू आता
    चंद्र लपला आभाळी
       दोन जीवांची मैफिल
          तेव्हा रात्र होई काळी

मन आनंदी आनंद
   तुझ्यासंगे बिलगता 
       देह प्रेमात भिजल
          रात्र चालता चालता

___________________

विठूपुत्र: अविनाश लाड

©Avinash Lad दोन जीवांची मैफिल...
avinashlad2229

Avinash Lad

New Creator