Nojoto: Largest Storytelling Platform

आईविना.... नयनात आसवांचा दाटून पूर गेला, आईच आज

आईविना.... 

नयनात आसवांचा दाटून पूर गेला,
आईच आज नाही, फाटून ऊर गेला! 

जन्मास घातलेला तो सुदिन आज आला,
हृदयात कालवा अन् साराच नूर गेला! 

केले कधीच नाही मी साजरे सणाला,
तू आमच्यात नाही, उल्हास दूर गेला! 

जाऊन लोटले ना तुज चार मास आई,
आळवित राग जाता, माझाच सूर गेला! 

आषाढ मास आता बरसेल कैक वेळा,
कसलीच ओल नाही, आला नि भूर गेला! 

आईविनाच यंदा सालात वाढ होई,
भलताच देव खेळ्या, देऊन तूर गेला! 

जाणे तसेच येणे हाती न माणसाच्या,
घ्या काळजी जराशी, करता कसूर गेला! 

® जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #आई
आईविना.... 

नयनात आसवांचा दाटून पूर गेला,
आईच आज नाही, फाटून ऊर गेला! 

जन्मास घातलेला तो सुदिन आज आला,
हृदयात कालवा अन् साराच नूर गेला! 

केले कधीच नाही मी साजरे सणाला,
तू आमच्यात नाही, उल्हास दूर गेला! 

जाऊन लोटले ना तुज चार मास आई,
आळवित राग जाता, माझाच सूर गेला! 

आषाढ मास आता बरसेल कैक वेळा,
कसलीच ओल नाही, आला नि भूर गेला! 

आईविनाच यंदा सालात वाढ होई,
भलताच देव खेळ्या, देऊन तूर गेला! 

जाणे तसेच येणे हाती न माणसाच्या,
घ्या काळजी जराशी, करता कसूर गेला! 

® जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #आई