Nojoto: Largest Storytelling Platform

गावाकडचे चार दिवस कसे गेले कळलंच नाही.. संपली सुट्

गावाकडचे चार दिवस
कसे गेले कळलंच नाही..
संपली सुट्टी तरी मात्र 
शहराकडं मन वळलचं नाही..

शहर आणि गावाचं
गणित अजून जुळलंच नाही..
खूप दिवस झाले तरी
शहरात मन रुळलंच नाही.. 

गावाकडचं सुख गड्या
गाव सोडून मिळलचं नाही ..
खरंच गावाकडचे चार दिवस
कसे गेले कळलंच नाही..

खरंच गावाकडचे चार दिवस
कसे गेले कळलंच नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  चार दिवस गावाकडचे

चार दिवस गावाकडचे #मराठीकविता

144 Views