Nojoto: Largest Storytelling Platform

नवी सकाळ नवे स्वप्न हेच असत आयुष्यातलं जगणं.. वय व

नवी सकाळ नवे स्वप्न
हेच असत आयुष्यातलं जगणं..
वय वाढत जातं तसं 
जबाबदारीला स्वीकारणं..

आशा, आकांशा, अपेक्षा 
क्षणात सगळ्यांचं विखुरणं..
हताश होता क्षणी 
मायेच्या जिवाचं विरघळणं..

ओंजळीसवे फिरत फिरत
एकेक स्वप्नाला सावरणं..
स्वप्ना मागे पळताना 
अलगद डोळ्यांना मिटवणं..

नवी सकाळी नवे स्वप्न
हेच असत आयुष्यातलं जगणं..
सगळं करून सावरून 
हाती उरतं फक्त मरणं..

हाती उरतं फक्तं मरणं..

©गोरक्ष अशोक उंबरकर आयुष्य