Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेयसी कशी वर्णावी कांति तव जणू आकाशी चंद्र नवा

प्रेयसी

कशी वर्णावी कांति तव
जणू आकाशी चंद्र नवा
चंद्रकांति तुझिया पाहुनी
मनी शितले झरा वहावा

मंजुळ वाणी तुझिया सखये
कोकिळेने जव स्वरसाज गावा
वाणी तुझिया ऐकुनी सत्वर
तणावात ही विरंगुळा व्हावा

हास्य तुझे ते खुलिनी येता
हर्ष सागरी डुबूनी जावा
तुझ्या सोबती घरोघरी मग 
सणासुदीचा श्रावण यावा

नितळ निरागस नयन लाघवी
मोगरा अंगणी फुलून जावा
दृष्टी तव पडता मजवर
मनमयूर मग प्रफुल्लित व्हावा

म्हणूनी सये,
तुझ्या आठवणींचा साज मजवरी 
निरंतर तो खुलत रहावा

_सुरज उबाळे #प्रेयसी
प्रेयसी

कशी वर्णावी कांति तव
जणू आकाशी चंद्र नवा
चंद्रकांति तुझिया पाहुनी
मनी शितले झरा वहावा

मंजुळ वाणी तुझिया सखये
कोकिळेने जव स्वरसाज गावा
वाणी तुझिया ऐकुनी सत्वर
तणावात ही विरंगुळा व्हावा

हास्य तुझे ते खुलिनी येता
हर्ष सागरी डुबूनी जावा
तुझ्या सोबती घरोघरी मग 
सणासुदीचा श्रावण यावा

नितळ निरागस नयन लाघवी
मोगरा अंगणी फुलून जावा
दृष्टी तव पडता मजवर
मनमयूर मग प्रफुल्लित व्हावा

म्हणूनी सये,
तुझ्या आठवणींचा साज मजवरी 
निरंतर तो खुलत रहावा

_सुरज उबाळे #प्रेयसी