Nojoto: Largest Storytelling Platform

White माऊली भेट(अभंग) निघालो वारीला॥ विठ्ठल भेटील

White माऊली भेट(अभंग)

निघालो वारीला॥ विठ्ठल भेटीला॥
मनी सजविला ॥ भेटीयोग ॥

दर्शनास लागे॥ भक्तांचीच रिघ॥
दिंडीचा परीघ॥ डोळी दिसे॥२॥

आस लागे जिवा॥ पंढरीला जावे॥
तल्लीन मी व्हावे॥ भजनात ॥३॥

कानात भरला॥ टाळांचा गजर॥
हृदयाला पाझर ॥ फुटे कसा॥४॥

होऊनिया दंग॥ वाजवी मृदुंग ॥
ऐकुनी अभंग ॥ मन लागे॥५॥

विटेवरी उभा॥ अठ्ठावीस युगे॥
भक्त सदा जागे॥ विठुसाठी॥६॥

आषाढ कार्तिकी॥ पंढरीची वारी॥
आर्त हाक खरी॥ माऊलीची॥७॥

जय हरी विठ्ठल 🙏🏻

मोहन सोमलकर नागपूर

©Mohan Somalkar
  #अभंगगाथा