Nojoto: Largest Storytelling Platform

साई दरबारी॥ आरती गाईन॥ रुप मी पाहिन॥ साईचे त्या॥

साई दरबारी॥ आरती गाईन॥
रुप मी पाहिन॥ साईचे त्या॥

साई माझे गुरु॥मार्ग दाखविते ॥
धीर रोज देते॥ माझ्या मना॥

आधार मिळतो॥ भक्तीचा विश्वास ॥
साई तुझा ध्यास ॥ नित्यनवा॥

जावे त्या शिर्डीला॥ चढावी पायरी॥
जीवन उध्दारी ॥ माझा साई॥

मोहन सोमलकर 🙏🌹

©Mohan Somalkar
  #साईं