Nojoto: Largest Storytelling Platform

White शीर्षक: जाणता राजा शिवनेरी जन्मले शिवबा गर्ज

White शीर्षक: जाणता राजा
शिवनेरी जन्मले शिवबा
गर्जला महाराष्ट्र माझा,
जिजाऊचा पुत्र ठरला हा
स्वराज्याचा जाणता राजा..१
राम अर्जुन कथेतुनी
दिधली संस्काराची शिदोरी,
दादाजीच्या धूर्त बाण्यानी
उमगली  मुघल माजोरी...२
स्वराज्यस्थापनेची  प्रतिज्ञा
घेतली रायरेश्वर मंदिरी,
शिवाजींच्या अचाट कर्तृत्वाने 
विजय मुकुट राज्य शिरी.. ३
गनिमी काव्याने लढूनी 
दुष्मनांना दिली कठोर सजा,
रयतेचा वाली शिवबामुळे 
निर्भय स्त्री अन सारी प्रजा.. ४
मावळ्यानी त्वेषाने लढूनी
शिवबांस सोबतीची साऊली,
अत्यार शृंखला तोडणारा रत्न
देणारी  धन्य- धन्य ती माऊली.५

©Harsha Patil
  #life_quotes