Nojoto: Largest Storytelling Platform

विवेक प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे कराल जे जे

विवेक

प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे
कराल जे जे ते ते सारे नेक पाहिजे!

रुसवे फुगवे लाडीगोडी खताप्रमाणे
फुलण्या संसारवेल बहुतेक पाहिजे!

नातीगोती जणू गझल ती आयुष्याची
नजाकतीने संवादाची फेक पाहिजे!

दोन घराला आणि कुळाला जोडत जाते
पाठीपोटी प्रत्येकाच्या लेक पाहिजे!

दुसऱ्याचेही दुःख जाणणे कलाच मोठी
त्यासाठी तर हृदयात विवेक पाहिजे!

जयराम धोंगडे, नांदेड
9422553369

©Jairam Dhongade #teddyday
विवेक

प्रत्येकाचा विचार आता एक पाहिजे
कराल जे जे ते ते सारे नेक पाहिजे!

रुसवे फुगवे लाडीगोडी खताप्रमाणे
फुलण्या संसारवेल बहुतेक पाहिजे!

नातीगोती जणू गझल ती आयुष्याची
नजाकतीने संवादाची फेक पाहिजे!

दोन घराला आणि कुळाला जोडत जाते
पाठीपोटी प्रत्येकाच्या लेक पाहिजे!

दुसऱ्याचेही दुःख जाणणे कलाच मोठी
त्यासाठी तर हृदयात विवेक पाहिजे!

जयराम धोंगडे, नांदेड
9422553369

©Jairam Dhongade #teddyday