Nojoto: Largest Storytelling Platform

स्वर्ग म्हणजे काय कोणाला हे माहीत आहे विचार करुन स

स्वर्ग म्हणजे काय कोणाला हे माहीत आहे
विचार करुन सांगा तुम्हाला मी विचारत आहे

अहो काश्मीरला सर्वजण जमिनीवरील स्वर्ग म्हणतात
पण काही जण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात

पण मला वाटते स्वर्ग तर आईच्या कुशीत असतो
कारण तिथे आपला परका कसलाही लवलेश नसतो

सर्व सुख मिळते मला माझ्या आईच्या कुशीत
दुःख होता मना तरी शिरतो आईच्याच कुशीत

दिवसभर जरी मी राहीलो व्यस्त माझ्या कामात
झोप शांत येते मला फक्त माझ्या आईच्या कुशीत

म्हणून सांगतो जनास काहो स्वर्ग बसला शोधत
स्वर्ग तर आहे खरा फक्त आईच्या कुशीत

                                    -- मंगेश काणकोणकर. स्वर्ग

स्वर्ग #poem