Nojoto: Largest Storytelling Platform

ती प्रत्येक मनाचा एक कप्पा फक्त तिच्यासाठीच असतं प

ती
प्रत्येक मनाचा एक कप्पा
फक्त तिच्यासाठीच असतं
प्रत्येकाच्या हृदयावर हक्क 
तिचाच जास्त असतो
थकलेल्या मनाला विसावा तिथेच मिळतो
भरकटलेली म्हणे तिथूनच सावरतात
तीच्या सहवासाने 
अश्रूचेही मोती होतात
प्रसंगी असंख्य प्रश्न सोडवणारी 
ती एक वटवृक्ष पण होते
ती खरच जेव्हा निस्वार्थ असते
तेव्हा दगडाचाही हिरा होतो
ज्याला तिची सोबत मिळते
त्याचा देवालाही ठेवा होतो
पण जर ती स्वार्थी असेल
तर माणूस स्वतःपासून दुरावतो
जीवनाचा खरा आनंद
त्याच्यासाठी मृगजळ ठरतो
खरंच नशीबही नतमस्तक होते
जिथे खरी मैत्री असते
जी स्वतः वटवृक्ष बनून
खऱ्या मैत्रीला जगवते.

©Monica Bora
  ##ती