Nojoto: Largest Storytelling Platform

Best ती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसावन तीज कब की है, ज्योति तीव्रता का मात्रक क्या है, love तीन पेग बलिए, हरतालिका तीज कब है, तीरन से काटे तीरन को lyrics,

  • 254 Followers
  • 852 Stories

Saumitra Joshi

#ती शय्या मखमालीची #DearKanha

read more
ती शय्या मखमालीची
राधेस टोचते आता,
का कान्हा वळला नाही 
यावेळी जाता जाता!

माझ्याहुन काय असावे
कान्हासी इतके प्रिय?
पाव्याला जागच नाही
सुर निजून गेले काय?

धूसरशी काळी छाया
मग पडली अंगावरती
ते कुरुक्षेत्र का नाचे
त्याच्या अन माझ्याभवती

तो तिथेच अडकुन पडला
पार्थाच्या मोहापायी
गीतेच्या जन्मापुढती
राधेची यादच नाही.

ती येते सौधावरती
मग थेट गवाक्षी जाते
ती भिरभिरते एकाकी
कान्ह्याची वाट पहाते.

@गुढ

©Saumitra Joshi #ती शय्या मखमालीची 
#DearKanha

Rashmi Hule

Meaning :- Vo(he) barasti barish, ye(she) mitti ka sugandh Vo gungunata bhavara... Ye fulonka makarad विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 ती हा विषय दिपाली मथाने यांनी सुचविला आहे, अभिनंदन दिपाली जी! 👌💐👍 #ती #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine

read more
तो बरसणारा पाऊस
ती तृप्त मृदगंध...
तो भिरभिर भ्रमर
ती फुलांचा मकरंद..  Meaning :- Vo(he) barasti barish, ye(she) mitti ka sugandh
Vo gungunata bhavara... Ye fulonka makarad

विषय  - चारोळी collab       शुभसंध्या मित्रहो 🙂
ती हा विषय दिपाली मथाने यांनी सुचविला आहे, अभिनंदन दिपाली जी! 👌💐👍

#ती #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine

Manasi Ghatge

लेखकानों💕🙏 शुभ संध्या... जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे

read more
खरचं स्वतंत्र आहे का ती?
उलटूनी गेले खुप वर्षे देश स्वतंत्र होवून पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
न जाणो तिचे स्वातंत्र्य कसं कोणी हिरावल
कमी वयात लग्न होवून जबाबदाऱ्या पेलन तिच्याच नशिबी आलं पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
तिच्या शिक्षणाचा त्याग करावा लागला तिला
का तर सांभाळायचं होता कुटुंबाचा डोलारा तिला पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
रस्त्यावरून चालताना कोणी छेड काढली तिची तर निमूटपणे सहन करायचं तिने
उलटून जर प्रतिकार केला तिने तर घराण्याची अब्रू घालवायचं वेड लागलं असं बोलतो निर्लज्ज समाज पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
नाही करत कोणत काम घरच्यांच्या, नवऱ्याच्या आणि मुलांच्या परवानगी शिवाय
केलाच चुकून तस तर ठरते मोठी गुन्हेगार सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यातून पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
सगळ्यांवर एवढं जीवापाड प्रेम करून उलट तिचंच चारित्र्य कसं आहे यावर बोलतात हे किळसवाणे समाजातील लोक
उलट बोललं तर बावळट कोणत्या गोष्टीला विरोध केला तर बिनडोक मग कधी संधी देणार तिला तीच मत मांडण्याची? का नाही समजून घेत तिच्या भावना कोणी?
पण तरदेखील प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती?

 लेखकानों💕🙏
शुभ संध्या...
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे

Shankar Kamble

Shankar Kamble

Monica Bora

##ती

read more

Monica Bora

Monica Bora

##ती

read more

amit bawaskar

प्रेम सोडल ना मिळालेल असून
जिवनात तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच  
मी 4th मध्ये असताना  माधुरी  
सरांसोबत भांडायची आणि मीच  
प्रथम येईल असे म्हणायचे आणि सर मला विचारायचे  मी म्हणायचो ती येईल पहिली  खुप आवडायची मला ती आणि कदाचित
नव्हे तिला आवडायचोच मी पण कळल
नाही हे प्रेम आहे  मग न जाणे 5th or6th std ती निघून गेली अचानक शाळेतून नंतर जिवनात शुन्यच पुन्हा परमपित्याने 11th science 12th science मध्ये प्राची जिवनात
आणली जर्नल मागायच्या   निमित्ताने मी  आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या नोट्स मागायच्या निमित्ताने ती एकमेकांशी बोलायचो
इलेक्ट्रॉनिक्स माझा सर्वात आवडता विषय आणि बारावीच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरला  ती आणि मी एकाच वर्गात  लकीली माझ्या साइडच्या row ला एक नंबर मागे  अचानक
पेपर सोडवता सोडवता तिच्याकडे बघितले
ती ज्या खोल नजरेने बघत होती माझ्याकडे
ती नजर ते  नजरेतील प्रेम  विसरत नाही
शेवटच्या पेपर आटोपल्यावर  घरी निघतांना
भाऊ म्हणाला कोणाशी काही बोलायचे आहे का  कदाचित माझ्या मनातील त्याला समजले होते मग मी तिच्याशी बोललो  
फक्त हेच काय कसा पेपर गेला वगैरे वगैरे  परत शापित शांतता. . . . . .
नाही सांगता आले की माझे तुझ्यावर खुप
प्रेम आहे. . . .
माझ्या प्रारब्धातील कुठले तरी पाप आडवे आले
निश्चित.
त्यावेळी fb mobile whatsapp
असते तर सांगता आले असते कदाचित
बर्‍याचदा तिला fb वर शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडली
कधी वाचल हे तर ये परत माझ्या जिवनात
कोणीही सामावून घेण अवघड वाटत मला
कमाल आहे की परमातम्याची शिक्षा
15/20 वर्षे झाली असतील अजुनही
विसरता येत नाही तुला
तुझा अमित2412022

©amit bawaskar #प्रेम #ती #प्रेयसी #प्रीत #Love 

#OneSeason

Kailas Tidke

डोळ्याला गॉगल,अंगात जीन्स आणि टॉप
हातात iphone, होता तिला चांगला जॉब ../
हळूच फोनवर बोलली वाटेत दिसतय हॉटेल
जेवन आणू का इथूनच आज होता कामाचा व्याप../
पलीकडल्या उत्तराने आसू ओघळले गालावरती ...
खरच आज मुक्त आहे का ती ?
खरच आज मुक्त आहे का ती ?

©Kailas Tidke #ती#स्त्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile