Nojoto: Largest Storytelling Platform

#मी नाही..माझं वयच चोरतंय मला.. ॠतुचक्राला चकवता च

#मी नाही..माझं वयच चोरतंय मला..
ॠतुचक्राला चकवता चकवता आज इथवर आलो 
वय चोरता चोरता आता खरा दिसायला लागलो 
माझा व वयातला निराळा अबोला हाच तर खरा बोलका असतो 
दोघांना कळत नाही असं नाही आलटून पालटून आम्ही दोघं हसून घेतो 
माझ्या नकळत आधी वय हसून घेत चेहरा तुला कुणी उसना देणार नाही 
माझ्या नकळत तूही हसून घेत जा चोरून हसणं उधारीवर कोणी देत नाही 
आपलाच माणूस आपल्याशी अनोळखी हे बघून
माझ्या मुखाचा वर्ण उजळ झाला 
त्या वयाची केली मी ऐसी की तैसी अन्
बेगडी भावविश्वात मी माझा आनंद जपला
हल्ली मी वयाला ओळखत नाही अन्
तोही मला ओळख दाखवत नाही
हक्काची माणसही हल्ली परकी होतात
ते सुद्धा अबोला सोडून इतर काही वागत नाही
मी आणि वय सध्या डोळ्यास डोळे भिडवत नाही चोर दोघे
निसर्गाने अनमोल नजराणा पदरी दिला 
दोघेही आता एकमेकांना कसलाच
पुरावा मागत नाही..
@शब्दवेडा किशोर '

©शब्दवेडा किशोर #पुरावा