Nojoto: Largest Storytelling Platform

Best मी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove मीनिंग, 'मीर की शायरी इन हिंदी', मीना कुमारी की शायरी, 'मीर तक़ी मीर की शायरी', 'मीर की शायरी',

  • 411 Followers
  • 1535 Stories

सचिन

#sad_shayari #मी मराठी कविता छोटी कविता मराठी

read more
White असेन मी ,
नसेन मी,
मी असून ही नसेन मी
मी नसून ही असेन मी.

©सचिन #sad_shayari 
#मी  
मराठी कविता 
छोटी कविता मराठी

शब्दवेडा किशोर

White #मी कवी नाही....
शब्दवेडा किशोर 
मी छान लिहितो..असं जवळचे म्हणतात...मी भावना व्यक्त करतो पण त्या जो कवीमनाचं असतो किंवा ज्याला खरंच माणसातलं माणूसपण कळतं त्यालाच कविता समजतात पण मीच स्पष्ट करतो..मी कुणीही कवी नाही व हे जे काय लिहितोत्याचं श्रेयही माझं नाही.ती जीवनात येण्याआधीही मी लिहायचो पण मला असं वाटतं की माझ्या लेखणीला खरी धार ती आयुष्यात आल्यानंतर मिळाली.ती आयुष्यात आली अन् नकळत मी कधी अलगदपणे तिच्या सहवासात गुंतत गेलो,गुरफटत गेलो ते मला कळलं देखील नाही अन् स्वतःला शब्दात कसा हरवत गेलो तेही मज उमजलं नाही.
              आधी माझ्या कविता आणि लेख हे फक्त लिखाण होतं असं मला वाटतं पण आता ती जीवनात आली आणि बहुधा माझ्या लेखणीस नवी प्रेरणा मिळत गेली.हल्ली माझ्या कविता म्हणजे जास्त करून तिचा न माझा अदृश्य स्वरूपातला संवाद असतो.ती जवळ नसतानाही तिच्याच धुंदीत जगण्याचा तो एक बहाणा असतो.बहुतेक तीच माझ्या लेखणीतलं शब्दस्वरूप होऊन मला सतत भेटत असते अन् माझ्या मनीच्या भावना कागदावर उतरवत असते.हे शब्दच माझं आता बहुतेक जगण्याचं नवं स्वरूप झालं आहे अन् अजूनही या सगळ्यात मी काही खुप मोठा लेखक किंवा कवी नाही एवढंच तुम्हा सर्वांना सांगणं आहे.

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #मी वाडा बोलतोय....
शब्दवेडा किशोर
कधी काळी माझ्या पोटात
मी माझ्या वास्तुपुरुषाच्या अनेक पिढ्यांना जपलंय
त्यांच्या सुखातंच माझं सुख मी मोठ्या आनंदानं शोधलंय
त्यांच्या वर सदा सुखाची छाया मी धरली
त्यांच्या चेहर्‍यावर हसु सतत फुललेलं राहावं म्हणून नियतीच्या उनपावसाची झळ कायम मी सोसली
काळ बदलला अन् कुठून कशी या गावात आधुनिकता येऊन तिची माझ्या अस्तित्वाला नजर लागली
नियतीने अजब खेळी खेळली अन् अनाहूतपणे इथल्या संस्काराची गाठोडी विरली जाऊन ती सुद्धा माझ्यागत अडगळीत जमा झाली
आता जुन्या दिवसाचे क्षण आठवत मी माझा
श्वासरथ कसाबसा हाकतो आहे
अन् या अंगणी पुन्हा नव्याने भरेल का माझ्या
निरागस पाखरांची शाळा याचीच वाट मी पाहतो आहे

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाचाशोध

शब्दवेडा किशोर

White #मी भाव अंतरिचे जाणिले....
शब्दवेडा किशोर
अंतर मिटवून मनामनाचे मी भाव अंतरिचे हे जाणिले
जाणिवांना माझ्या नव्याने स्वप्नांचे हे नवे पंख बघा जोडले
एक शापीत जोकर म्हणूनच आजवर मी माझे जीवन कंठिले
घेऊनी नवा जन्म मी पुन्हा नव्याने
माझे जुने ते शापीत जगणे पुन्हा आनंदाने स्विकारले
सदा इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या अस्तित्वाला मी जळते ठेवले
स्व-आनंद नंतर बघायचा असे ठरवून
स्वतःला जगाच्या हाती सोपवून पुन्हा नव्याने मीच
स्वतःला आनंदाने जगाच्या हातचं खेळणं बनविले
जन्मभर इतरांना हसवीन देईन सदा आनंद मी
अन् मरण्याआधी एक दिवस तरी मनभरून जगेन स्वतःसाठी
हेच स्वप्नं मी कायम मनी रंगविले
मी जगाच्या रंगभुमीवरचा एक शापीत जोकर
हे माझे नियतीने मज दिलेले ओळखीचे स्वरूप कायम जपायचे
हेच मनी ठरवून पुढे हसत जगायचे ठरवले

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

#मी

read more
White #मी..
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी 
इतरांना रित्या ओंजळीने
सदा सुखं वाटली 
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी 
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमौजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी

©शब्दवेडा किशोर #मी

शब्दवेडा किशोर

White #मी.. एक शापित जोकर
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी 
इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली 
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
मी नित्यनियमाने हसत हसत वाहिली
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमोजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

Dharmendra Gopatwar

📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️
 
  _ श्रवण तुझा मी 
तु श्रावणी  माझी ,
 सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . .

ही गाठ रेशमाची जुळता ,
         सोनेरी या क्षणी ,
नवरोबा मी तुझा 
                    बायको तु माझी झाली . .
 
          भेट तुझी पहीली आठवते . ,
श्रावणातला जणू तो पहिल्या 
     पाऊसाची चाहूल देणारी 
 नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . .

 नुकतंच . ,
चालण्याच्या प्रेमात पडलेला 
 रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . .
प्रेमाचे तरंग मनात 
 प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . .

         जीवनात तु माझ्या
इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ?
अर्धांगिनी बनून सोबती 
             तु असशीलच . . !

या मनाची हाक . ,
                 पाऊलासोबत पाऊल टाकत 
प्रियसी बनून सोबत चालशिल ना ?

नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x
" श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ."

जीवनसंगिनी झाली 
            खरी तू माझी ,
 जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . ,
 सांग बरं . . ! तु माझी . .  सखी ' होशील ना . . ? 2x

©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता

Mdmunna Alam

Welcome to welcome

©Mdmunna Alam #christmascelebration #माय #प्रोफाइल #फॉलो #मी #प्लीज

Vaishnavi Kotnake

#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

read more
लोकं जगत असतील श्वास घेऊन,
मी जगतेय तुला लिहून!
वसु..

©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

Shankar Kamble

विवंचनेचे डंख हजारो
चाळण करती रोज मनाची
उपरती ना होई मनुजा
झडून गेल्या आर्त क्षणाची..

अथांग,अविरत लहरे सागर
थेंब एक तू पृथा अनामिक
अस्तित्वाचा किती बढाया
कल्पित, रंजीत अती भावनिक..

ओसरलेला गडद गहिरा
इंद्रधनुचा फिका पिसारा
शापीत भवती गंधर्वाचे
रुदन चालले कोण सहारा?

कसा टळेना पाठलाग हा?
सावज पारध कोण कळेना?
वाट निसरडी पाय रुतले
चुकलेली लय पुन्हा जुळेना..

पेरून फासे क्रूर नियतीने
जर्रजर्र केले पुरते आता
हरवलेली ऊब कुशीची
कोण आता कुरवाळील माथा?

©Shankar Kamble #SunSet #जीवन #जीवनअनुभव #जीवनदर्शन #जगणे #दुःख #सुख #मी #अनामिक #दर्पण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile