Nojoto: Largest Storytelling Platform

#माझी कविता. आठवते कविता साठवते कविता मनातली चरि

#माझी कविता. 

आठवते कविता
साठवते कविता
मनातली चरित्रे 
दाखवते कविता.. ||१||

मनातलं रान
भिजवते कविता
जगण्याला बळ
देते ती कविता..||२||

निरागस नात्याला
फुलवते कविता
आत्म्याला शांती
देई ती कविता..||३||

स्फुरण देशभक्तीचे
जागवी ती कविता
अशांत त्या मनाला
शांती देई कविता..||४||

मातृत्वाचे रंग
दाखवी कविता
बाग सुखाची
फुलवते ती कविता..||५||

दुःख विसरायला
लावे ती कविता 
सुखाच्या क्षणांना
कुरवाळते कविता..||६||

वैशाली येनुगवार✍️
ध्रुवतारा 💫✨

©Vaishali Yenugwar