Nojoto: Largest Storytelling Platform

नाही सांगणार तुला तुझ्यासाठी किती रडले ... देवापु

नाही सांगणार तुला 
तुझ्यासाठी किती रडले ...
देवापुढे तुला किती मी  मागितले.
नाही दाखविले विरहात मनाला 
त्रास किती ते झाले होते .
शांत पण अशांत मनात प्रश्न एकच सतावीत
 असे कसे झाले? काय कुठे चुकले ?
आपल्यात अंतर का पडले कळत नव्हते..
अंतरानेच मात्र समजावले 
प्रेम तुझ्यावर किती  आहे मी केले 
तुच माझे हास्य अन् तुझ्यातच माझे सुख होते....
तुझ्यातच मन माझे पूर्ण विसावले होते
..जवळ असून समजले नव्हते 
दूर गेल्यावर उमजले होते....  


                                       🌹सुवार्ता 🌹

©suwarta
  #VantinesDay