Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या जवळ बसणे ते एकटक पहाणे नजरेला नजर भिडता

तुझ्या जवळ बसणे 
ते एकटक पहाणे 
नजरेला नजर भिडता 
मान झुकुन खाली जाणे 

मनाची हिरवळ फुललेली 
ह्दयाला थंडावा देणारी 
हातात हात धरुन 
प्रेमाने जवळ घेणारी 

मनाची प्रसन्नताच हिरवळ 
विरहात तर सगळे उदास 
नजरेवर असतो अंधार 
पोर्णिमेच्या चांदण्याची आस 

तुझा तो प्रेमळ स्पर्श 
भावना जपण्याची कला 
शब्दाने मन जिंकुन 
आपलस केलस मला 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  ऋतु हिरवा

ऋतु हिरवा #मराठीकविता

27 Views