Nojoto: Largest Storytelling Platform

विषय-चित्र चारोळी/काव्य लेखन शीर्षक- कान श्रवण क

विषय-चित्र चारोळी/काव्य लेखन

शीर्षक- कान

श्रवण कानाचे सुंदर कार्य
पण ऐकणारे कानी लागतात
दुसऱ्याना कळू नये म्हणून
इतरांचे कान फुकतात

कान हे सापाप्रमाणेच विषारी
एखाद्याला कानपिचक्या देतात
यावर त्यांचे भागत नसते 
हितचिंतक म्हणून कान भरतात

ऐकावे जनांचे करावे मनाचे
पण आता लोकं उलटं करतात
आपले सोडून परक्यावर जास्त विश्वास
कारण ते हलक्या कानाचे असतात

एखाद्याचे वाईट चिंतण्या
दुर्जनांचा कानमंत्र घेतात
सज्जनांनी कान उघडणी केली की ,
हेच लोक कानावर हात ठेवतात

मला एवढेच सांगणे
कानामागून येऊन कशाला तिखट व्हावे
भिंतीला ही कान असतात
एका कानी ऐकावे दुजा कानी सोडून द्यावे

      काही वाक्प्रचार
कानी लागणे-चहाड्या करणे
कान फुकणे- निंदा करणे
कानपिचक्या देणे- दोष दाखवून समज देणे
ऐकावे जनांचे करावे मनाचे- योग्य हिताचे करणे
हलक्या कानाचे-खोटी गोष्ट खरी वाटणे
कानमंत्र देणे-सल्ला देणे
कान उघडणी करणे-स्पष्ट बोलणे
कानामागून येऊन तिखट होणे-वरचढ होणे
कानावर हात ठेवणे- माहीत नसणे
भिंतीला कान असतात -सावधगिरी बाळगणे
एका कानी ऐकावे दुजा कानी सोडून द्यावे- गरजेचे घेणे


श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
  कान