Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9936635668
  • 20Stories
  • 30Followers
  • 175Love
    47.2KViews

अनंत पाटील

  • Popular
  • Latest
  • Video
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

लेक लाडकी या घरची

मांडव सजला नवरी सजली
हिच्या अंगाला हळद लावा
लेक लाडकी या घरची
उद्या जाईल सासरच्या गावा    .......//धृ//

ढोल ताशे बँड बाजे
सूर सनईचे घुमतील दारी
मना सारखा मिळाला पती
मौजाई मातेची पुण्याई सारी
चारी बाजू स्वागताला
फुलांचे तोरण लावा.......

लेक लाडकी या घरची
उद्या जाईल सासरच्या गावा...........//1//

आईबापाची खरी संपत्ती
उद्या होईल दुसऱ्या नावावर
लाडी लाडी हट्ट पुरवुनी
आम्ही जपली तळहातावर
कन्यादान आमच्या नशिबी
लग्नसोहळा पार पडावा.......

लेक लाडकी या घरची
उद्या जाईल सासरच्या गावा..........//2//

पाठवणीचा खेळ सावला
कोठे अश्रूला जागा नाही
मागे वळुनी पाहे परतुनी
बाप तेवढा दिसत नाही
आशीर्वाद देण्यासाठी
आपली हजेरी लावा........

लेक लाडकी या घरची
उद्या जाईल सासरच्या गावा..........//3//

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत.

          *शुभ सकाळ.*
                   *सौ. उर्मिला*

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

विषय-विदूषक

शीर्षक-अध्यापक

हसवून जगाला करतो लोटपोट
स्वतःला म्हणवितो मी विदूषक
पोटातील सारं दुःख बाहेर काढतो
जणू हास्य कलेचा अध्यापक

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

विषय-चित्र चारोळी/काव्य लेखन

शीर्षक- कान

श्रवण कानाचे सुंदर कार्य
पण ऐकणारे कानी लागतात
दुसऱ्याना कळू नये म्हणून
इतरांचे कान फुकतात

कान हे सापाप्रमाणेच विषारी
एखाद्याला कानपिचक्या देतात
यावर त्यांचे भागत नसते 
हितचिंतक म्हणून कान भरतात

ऐकावे जनांचे करावे मनाचे
पण आता लोकं उलटं करतात
आपले सोडून परक्यावर जास्त विश्वास
कारण ते हलक्या कानाचे असतात

एखाद्याचे वाईट चिंतण्या
दुर्जनांचा कानमंत्र घेतात
सज्जनांनी कान उघडणी केली की ,
हेच लोक कानावर हात ठेवतात

मला एवढेच सांगणे
कानामागून येऊन कशाला तिखट व्हावे
भिंतीला ही कान असतात
एका कानी ऐकावे दुजा कानी सोडून द्यावे

      काही वाक्प्रचार
कानी लागणे-चहाड्या करणे
कान फुकणे- निंदा करणे
कानपिचक्या देणे- दोष दाखवून समज देणे
ऐकावे जनांचे करावे मनाचे- योग्य हिताचे करणे
हलक्या कानाचे-खोटी गोष्ट खरी वाटणे
कानमंत्र देणे-सल्ला देणे
कान उघडणी करणे-स्पष्ट बोलणे
कानामागून येऊन तिखट होणे-वरचढ होणे
कानावर हात ठेवणे- माहीत नसणे
भिंतीला कान असतात -सावधगिरी बाळगणे
एका कानी ऐकावे दुजा कानी सोडून द्यावे- गरजेचे घेणे


श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
  कान
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

अलक

नवऱ्याची किंमत

पगार पुरेसा नसला तरी तो आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे पण बायकोच्या सतत टोचणीमुळे त्याचं मन अस्वस्थ झाले होते. वाईट विचार मनात येत होते परंतु दोन मुलांकडे बघून तसे करण्याचे धैर्य होत नव्हते. पण दैवाला काही दुसरेच मान्य होते की,त्याचे हृदय विकाराने निधन झाले. महिनाभर सांत्वनात गेला अन सुरू झालं लाईट बिल ,पाण्याचं बिल, ट्युशन फी ,शाळेची फी, गॅस संपलं, राशन संपलं, दुधाचे पैसे जे आजवर तिने कधी विचारात घेतले नव्हते. खरा संसार कोणामुळे चालत होता हे तिला कळून चुकले अन नवऱ्याची किंमतही!

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील


विषय - मायबोली मराठी 
अभंग लेखन

शीर्षक- वेड मराठीचे

वेड मराठीचे। बोल ते बोबडे।
गिरवावे धडे। बालपणी।।

मराठी ठसका। लावण्य शृंगार।
शोभे अलंकार। मायबोली।।

लवचिकपणा ।  सहज सुलभ।
वळवावी जीभ। अदबीने।।

रंगली मराठी। अभंग किर्तनी।
भूपाळी ओव्यांनी। संतवाणी।।

मजल मजल । बदलते भाषा ।
देह बोलीभाषा। विस्तारते।।

अलौकिक वसा। संस्कृती दर्शन।
परीस दर्पण। साहित्याचे।।

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

गझल

किंबहुना

काहीच  वाटत नाही  हो  त्या सरणाला
किंबहुना प्रत्येक जण घाबरतो मरणाला

छाती फुगवून दाखवतात दान करताना
किंबहुना विसरलात लोक त्या कर्णाला

मतभेद जिथे शक्य नाही बरोबरी करणे
किंबहुना काय गरजेची शत्रूता रावणाला

कशाला उगीच करावी उपकाराची भाषा
किंबहुना ते पटतच नसते आपल्या मनाला

दुःख अन दारिद्र्य अकारण येत नसतात
किंबहुना दुर्लक्षित करतात सांकेतिक क्षणाला

मुळीच भीती नसावी आयुष्य जगताना
किंबहुना शक्ती नसते पेलण्याची एकटेपणाला

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
  किंबहुना

किंबहुना #मराठीशायरी

27 Views

b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील


ब्रह्म विवाह (अरेंज मॅरेज)

लोकं म्हणतात उगीच केली लग्नाची घाई
सुंदर चांगली  स्थळं आली असती
प्रेम सफल नाही झालं म्हणून काय झालं
मी निवडलेली मुलगी ही छानच होती

ना गाजावाजा थोडक्यात उरकलं
ना पाहिली एकमेकांचे गोत्र
तिनं ही आनंदात घालून घेतलं
पाच हजाराचं गळ्यात मंगळसूत्र

नाहीच बाळगली कसली हौस
नाही लावला कधी तगादा
सणासुदीलाच योग साडीचा
यायचा मला प्रसंग एखादा

तिनं ही दिला एक सुखद धक्का
कन्यारूपी धनाची पेटी
जेवढे मानावे तेवढे थोडेच
देवाचे आभार कोटी कोटी

काय असतं संसाराचं सूत्र
दोन जीवांची कर्तबगारी
एकमेकांना सांभाळून घेणं
आहेच मग मातीच्या चुली घरोघरी

म्हणतात प्रेमविवाह जास्त टिकतात
कधी तरी ब्रह्म विवाह करून पहा
लग्नानंतर प्रेम जरा कलेनं वाढतं
थोडया प्रेमाचा आस्वाद घेऊन पहा

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील



उपाधी

मी जग सोडून गेल्यावर राहील फक्त नाव
पण असे किती ओळखतील माझ्या मनातले भाव

धन दौलत अन कीर्ती यापैकी काही नाही माझ्याकडे
उरली ती एक उपाधी त्यास कोण देईल इतके भाव

जग जिंकून ही सिकंदर खाली हात गेला
त्याची जगावर राज्य करण्याची सुटली नाही हाव

मृत्यूला जिंकण्याची कोणाकडे नाहीच असे सामर्थ्य
तरी काही खेळतात येथे जीवघेणी मारक डाव

लोक असं काही म्हणतात सुटला बिचारा मोहातून
कशी मिळेल चिरशांती जेथे सदा दिले अंतरी घाव

मी अन माझी उपाधी नका बांधू त्याची समाधी
पण जितेपणी एकदातरी करा प्रेमाचा वर्षाव

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
b0999e361f2bafa16d088950d4d67360

अनंत पाटील

नजरिया

लोग कहते है शराब पीने वाले शराबी होते है,
मगर मै कहता हू, ।
लोगो का नजरिया गलत है,
बस उनकी यही एक खराबी होती  है।

कोई पिते है डूब जाने के लिये,
तो कोई भूल जाने के लिये।
कोई पागल दिवाने
पिते है गम बाटने के लिये।
इनकी हर शाम गुलाबी होती है।

लोगो का नजरिया गलत है,
बस उनकी यही एक खराबी होती है।

वैसे तो मुझे एक पेग से चढती है।
पर ये दोस्त भी कहा मानते है
और मेरा खाली गिलास 
अपने आप ही भर जाता है।
दोस्ती मे  बस यही एक खुबी होती है।

माना  की शराब बुरी है
कुछ लोग इसे पिते नही।
मगर जो पिते है
वह क्या जाते नही।
मौत एक दिन आयेगी हम बाखुबी जानते है।

लोगो का नजरिया गलत है,
बस उनकी यही एक खराबी होती है।

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819542

©अनंत पाटील
loader
Home
Explore
Events
Notification
Profile