Nojoto: Largest Storytelling Platform

दरवेळी तुला गृहीत धरणं आज जरा चुकलंच माझं.. कल्याण

दरवेळी तुला गृहीत धरणं
आज जरा चुकलंच माझं..
कल्याणकारी पान माझं
आज जरा सुकलचं माझं..

माझ्या विश्वात येऊनी आज
आयुष्य जरा झुकलचं तुझ..
फाटक्या दरिद्रीने का होईना
आज नशीबही थुकलंच माझं..

वाटोळं झाल्याची खंत बाळगुनी 
आज मन थोड दुखलचं तुझं..
कल्याणकारी आयुष्याला
जीवन थोडं मुकलंच तुझं..

निर्णय घेतेवेळी निदान
थोडं तरी चुकलंच तुझं..
वाईट वाटलं आज मनाला
माझ्यामुळे आयुष्य हुकलंच तुझं..

माझ्या मुळे आयुष्य हुकलंच तुझं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  guilt