Nojoto: Largest Storytelling Platform

तमाचा अंधार, षड्रिपूंचे वादळ, तशात माझी जीवन नौ

तमाचा अंधार, 
षड्रिपूंचे वादळ, 
तशात माझी 
जीवन नौका ,
हेलकावणे अटळ...
वाऱ्या सम 
वेग मनाचा
आवरता आवरेना,
देवालयातला देव 
मज कुठे दिसेना...
मनाची होता 
गुंता गुंत ,
आठवले मज संत,
तुका,सावता,गोरा,चोखा अन् ज्ञानिया सारखे महंत ...           
 सत्व गुणांचे मग मेघ दाटले ,
काम ,क्रोध वाहून गेले,
लोभ ,मोह,मद,
मत्सर मातीत निमाले...
मज आता दिसू लागले ज्ञानाचे स्वयं प्रकाशित किरण,
सत्वाने स्वत्व शमले
चढले स्थितप्रज्ञतेचे स्फुरण...
 #Pournima Mohol 
21-08-2023
12:20 a.m

©Pournima Mohol
  #ChaltiHawaa