Nojoto: Largest Storytelling Platform

तलावाच्या काठावर, मी अनेकदा येते मनसोक्त विहार, मी

तलावाच्या काठावर, मी अनेकदा येते
मनसोक्त विहार, मी वाऱ्यासंगे करते
तासन् तास तलावाकडे, एकटक बघत राहते
मनातल्या गुजगोष्टी, त्याच्याकडे मांडत जाते

निळेशार पाणी तलावाच, संथपणे वाहत राहत
विचारांनी भरलेलं डोक, क्षणातच शांत होत
ती पक्षांची किलबिल, जणू काही सांगू पाहते
मनाच्या कोपऱ्यातील, आठवणी जागवून जाते

धावपळीच्या जीवनात, मन खुप थकुन जातंं
जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली, ते मात्र घुसमटून जातं
मन मोकळ करायला, सोबत मात्र कोणीच नसतो
तेव्हा या तलावाच्या काठावर, मित्र माझा निसर्ग असतो

©Dr Mangesh Kankonkar तलावाच्या काठावर

तलावाच्या काठावर #मराठीकविता