Nojoto: Largest Storytelling Platform

दंगल..... जाती - जातीत, धर्मा - धर्मात तेढ निर्मा

दंगल.....

जाती - जातीत, धर्मा - धर्मात तेढ निर्माण करा...
तरुणांची माथी भडकवा.. दंगली घडवून आणा...
काही निरापराध मरतील मरुद्या...
काही घर, दुकानं, गाड्या जळतील जळूद्या...

मग जाती जातीच्या धर्मा धर्माच्या झुंडी तयार होतील...
भेदरलेल्या घाबरलेल्या मतांच्या बँका तयार होतील ...

आता येतील दरोडेखोर राजकारणी
मतांच्या बँका लुटायला...
आमक्याला धडा शिकवायचा असेल तर
आम्हाला मत द्या...
तमक्या पासून संवरक्षण पाहिजे तर
आम्हाला मत द्या...

आरं द्याकी मत कुणालाबी काय फरक पडतो...
भगव्याला द्या, हिरव्याला द्या,
पिवळ्याला द्या, निळ्याला द्या,
नवनिर्मानाच्या चाळ्याला द्या...

एक ध्यानात येतंय का?
दंगल कालबी पेटली, आजबी पेटली,
उद्याबी असच काहीतरी घडणार..
आपलाच कुणीतरी आपलच डोकं फोडणार...

अमोल गायकवाड  ( वेणेगाव ) सातारा..

©Amol Gaikwad
  #Bond