Nojoto: Largest Storytelling Platform
amolgaikwad6811
  • 9Stories
  • 3Followers
  • 27Love
    40Views

Amol Gaikwad

या जगण्याची चुकली आहे सारी बेरीज, घेईन म्हणतो जन्म पुढचा माणसा खेरीज.

  • Popular
  • Latest
  • Video
94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

दंगल.....

जाती - जातीत, धर्मा - धर्मात तेढ निर्माण करा...
तरुणांची माथी भडकवा.. दंगली घडवून आणा...
काही निरापराध मरतील मरुद्या...
काही घर, दुकानं, गाड्या जळतील जळूद्या...

मग जाती जातीच्या धर्मा धर्माच्या झुंडी तयार होतील...
भेदरलेल्या घाबरलेल्या मतांच्या बँका तयार होतील ...

आता येतील दरोडेखोर राजकारणी
मतांच्या बँका लुटायला...
आमक्याला धडा शिकवायचा असेल तर
आम्हाला मत द्या...
तमक्या पासून संवरक्षण पाहिजे तर
आम्हाला मत द्या...

आरं द्याकी मत कुणालाबी काय फरक पडतो...
भगव्याला द्या, हिरव्याला द्या,
पिवळ्याला द्या, निळ्याला द्या,
नवनिर्मानाच्या चाळ्याला द्या...

एक ध्यानात येतंय का?
दंगल कालबी पेटली, आजबी पेटली,
उद्याबी असच काहीतरी घडणार..
आपलाच कुणीतरी आपलच डोकं फोडणार...

अमोल गायकवाड  ( वेणेगाव ) सातारा..

©Amol Gaikwad
  #Bond
94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

आली नाहीस कधीच पुन्हा.....

काय माहित काय झालं,काय झाला माझा गुन्हा...
आलेच! म्हणून निघून गेलीस, आली नाहीस कधीच पुन्हा...

आठवतंय का बघ मला मिठीत घेऊन रडली होतीस...
मी विचारलं काय झालं, तर काहीच नाही म्हणाली होतीस...
मग असं काय झालं, काय माझा घडला गुन्हा...
आलेच! म्हणून निघून गेलीस, आली नाहीस कधीच पुन्हा...

तुझी नि माझी भेट होईल असं आता वाटत नाही...
एकच तर आयुष्य असत दुसरं परत भेटत नाही...
काय झालं, कस झालं सांगू तरी कसे कुणा...
आलेच! म्हणून निघून गेलीस, आली नाहीस कधीच पुन्हा...

मी तुझी वाट बघतोय, हे मात्र विसरू नकोस...
तिथेच आहे मी अजून, इथे तिथे शोधू नकोस...
एकदा येऊन सांगून जा, काय माझा झाला गुन्हा...
आलेच! म्हणून निघून गेलीस, आली नाहीस कधीच पुन्हा..

कोणा वाचून कोणाचंच जगणं कधी आडत नाही...
कितीही अट्टाहास केला तरी, इथे मनासारखं घडत नाही...
काय माहित काय झालं, काय झाला माझा गुन्हा...
आलेच! म्हणून निघून गेलीस, आली नाहीस कधीच पुन्हा...

अमोल गायकवाड (वेणेगाव, सातारा)

©Amol Gaikwad #L♥️ve

अमोल गायकवाड (वेणेगाव)

©Amol Gaikwad #alone
94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

*फक्त तु.....*

पापण्या आडच्या जगात माझ्या
नकळत आलिस स्वप्नात तु

हिरव्या- हिरव्या पानात तु 
रंगबेरंगी फुलात तु 
पहिल्या- पहिल्या पाऊसात तु 
या मातीच्या गंधात तु 

खळखळणार्या झाऱ्यात तु 
फडफडणाऱ्या वाऱ्यात तु 
धडधडणाऱ्या मनात तु 
तडफडणाऱ्या क्षणात तु 

श्वासात तु,भासात तु,
नशात तु अन दिशात तु 
सांजसोनेरी उन्हात तु 
या चाफ्याच्या वनात तु 

मिलनात तु, विरहात तु,
हुंदक्यात तु अन आसवात तु 
सुरुवात तु, शेवट तु 
मी तुझाच अन माझी तु 

पापण्या आडच्या जगात माझ्या 
नकळत आलिस स्वप्नात तु ...!!!
                 
                    अमोल गायकवाड

(माझी डायरी १ जुलै २००८ गुरुवार)
वेळ दुपारची पाऊस पडत असावा बहुतेक..... फक्त तु

फक्त तु

94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

या जगण्याची चुकली आहे सारी बेरीज 
घेईन म्हणतो जन्म पुढचा माणसा खेरीज #HopeMessage
94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

पाऊस पहिल्या प्रेमाचा 

तु होतीस मी होतो पाऊस पडत होता फार 
वारा तुझ्या पदारासोबत खेळत होता थंड गार 

तु नखशिकांत सजलेली, तु चिंब चिंब भिजलेली 
बिलगून मला प्रिये डोळ्यांमध्ये लाजलेली 

नजर तुझी लाजेनं पापण्यांआड लपली होती 
या रात्रीची आस प्रिये मी मनामध्ये जपली होती 

पाऊस सारा जणू तुझ्या ओठांमध्ये लपला होता 
मीही तो पाऊस सारा ओठांनीच टिपला होता 

श्वास तुझा उसवलेला उरात माझ्या भरत होतो 
ओठांवरची लाली तुझ्या मी ओठांनीच चरत होतो 

स्पर्श तुझा ओलावलेला कुठेच होत नव्हता स्थिर 
माझ्या मनाला तरी आता कुठं उरला होता धीर 

तु मी अन पाऊस सगळं कस अधीर होतं 
नव्हती तमा कशाचीच दोघे पुरते बधिर होतो 

अंग अंग शहारले होते तुझे नि माझे प्रेमाने 
तु मला भिजवत रहा तुझ्या चंदेरी यौवनाने 

सगळं कस शांत झालं पाऊस पडून गेल्यावर 
ये पुन्हा मिठीत माझ्या आभाळ भरून आल्यावर

                      अमोल गायकवाड #paus
94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

*फक्त तु.....*

पापण्या आडच्या जगात माझ्या
नकळत आलिस स्वप्नात तु

हिरव्या- हिरव्या पानात तु 
रंगबेरंगी फुलात तु 
पहिल्या- पहिल्या पाऊसात तु 
या मातीच्या गंधात तु 

खळखळणार्या झाऱ्यात तु 
फडफडणाऱ्या वाऱ्यात तु 
धडधडणाऱ्या मनात तु 
तडफडणाऱ्या क्षणात तु 

स्वासात तु भासात तु
नशात तु अन दिशात तु 
सांजसोनेरी उन्हात तु 
या चाफ्याच्या वनात तु 

मिलनात तु, विरहात तु,
हुंदक्यात तु अन आसवात तु 
सुरुवात तु शेवट तु 
मी तुझाच अन माझी तु 

पापण्या आडच्या जगात माझ्या 
नकळत आलिस स्वप्नात तु...!!!
                 
                    अमोल गायकवाड
                   (वेणेगाव, सातारा.) फक्त तु

फक्त तु

94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

*स्पर्श.....*

स्पर्श तुझ्या झाला जनु 
स्पर्श झाला स्वर्गाला 
नकळत घडलं सारं कधी
कळलं नाही मनाला.

               रूप तुझे पाहून मी 
               माझाही न राहीलो
               स्वप्नात माझ्या सवे तुझ्या 
               प्रेम सागरी वाहिलो.

असतेस तु सोबत जेव्हा
तुलाच एकटक पाहतो. 
तु नसतानाही गर्दीमध्ये
तुलाच शोधत राहतो. 

              चेहरा तुझ्या चंद्र जसा 
              खट्याळपणे हसतो
              मला मात्र तुझ्यामध्ये 
              ताजमहाल दिसतो.

         अमोल गायकवाड.
        (वेणेगाव, सातारा.) स्पर्श

स्पर्श #poem

94c744b7384fbc60823da1bf8eefabd5

Amol Gaikwad

पाऊस पहिल्या प्रेमाचा 

तु होतीस मी होतो पाऊस पडत होता फार 
वारा तुझ्या पदारासोबत खेळत होता थंड गार 

तु नखशिकांत सजलेली, तु चिंब चिंब भिजलेली 
बिलगून मला प्रिये डोळ्यांमध्ये लाजलेली 

नजर तुझी लाजेनं पापण्यांआड लपली होती 
या रात्रीची आस प्रिये मी मनामध्ये जपली होती 

पाऊस सारा जणू तुझ्या ओठांमध्ये लपला होता 
मीही तो पाऊस सारा ओठांनीच टिपला होता 
, 
श्वास तुझा उसवलेला उरात माझ्या भरत होतो 
ओठांवरची लाली तुझ्या मी ओठांनीच चरत होतो 

स्पर्श तुझा ओलावलेला कुठेच होत नव्हता स्थिर 
माझ्या मनाला तरी आता कुठं उरला होता धीर 

तु मी अन पाऊस सगळं कस अधीर होतं 
नव्हती तमा कशाचीच दोघे पुरते बधिर होतो 

अंग अंग शहारले होते तुझे नि माझे प्रेमाने 
तु मला भिजवत रहा तुझ्या चंदेरी यौवनाने 

सगळं कस शांत झालं पाऊस पडून गेल्यावर 
ये पुन्हा मिठीत माझ्या आभाळ भरून आल्यावर

                      अमोल गायकवाड #Love

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile