Nojoto: Largest Storytelling Platform

हातात घेतलेला हाथ तुझा आयुष्यभर सोडणार नाही.. सात

हातात घेतलेला हाथ तुझा
आयुष्यभर सोडणार नाही..
सात फेऱ्यासोबत वचनांना 
कधी मोडणार नाही..

प्रेमाचे गणित माझ्या
कधी जुळणार नाही..
बेधुंद प्रेमाचे वारे
सहज कळणार नाही..

छोट्या मोठ्या चुकांवर
कधी छळणार नाही..
प्रत्येक हट्टाला तूझ्या
सहज टाळणार नाही..

 घाबरून कधी संकटाना 
एकटा पळणार नाही..
तुझ्याविना श्वास सुध्धा
मी घेणार नाही..

तुझ्याविना श्वास सुध्धा
मी घेणार नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  हातातला हाथ