Nojoto: Largest Storytelling Platform

White लढला नाही तरी चालेल स्वतःला मात्र विकू नको..

White लढला नाही तरी चालेल
स्वतःला मात्र विकू नको..
स्वाभिमान गहाण ठेवून
मताला सहज फेकू नको..

हजार पाचशेच्या नोटेसाठी
पाच वर्ष धुळीत मिळवू नको..
मिळालेल्या नोटांनी 
संसार तुझा उधळू नको..

स्पर्धेच्या या धावपळीत
सतरंज्या उचलत पळू नको..
बापाच्या कष्टाची जाण ठेव 
उगाच कुणावर जळू नको..

लोकशाहीतील अधिकारांना 
मतदान करणं टाळू नको..
हे माणसा लाचारागत
घाम कुणासाठी गाळू नको..

हे माणसा लाचारागत
घाम कुणासाठी गाळू नको..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  मतदान