Nojoto: Largest Storytelling Platform

भाळावरुनी मेघ सावळा, कृष्णनभाच्या आला. क्षण भेटूनी

भाळावरुनी मेघ सावळा,
कृष्णनभाच्या आला.
क्षण भेटूनी मनास माझ्या,
मृदगंधाचा गेला.

तरारलेला थेंब टपोरा,
विसावलेला भाळी,
स्पर्शासाठी आतुरलेली,
अधीर धरणी काळी.

प्रणय सुखाच्या आठवणींनी,
रोमांचित तन ओले.
स्पर्श लाजरा मनात दाटे,
अधर गुलाबी झाले.

मेघ सावळे उतरुन रानी,
सुगंध पसरत  गेले.
धुंद मोहरुन आली काया,
भिजले तनमन ओले.

अवघ्या देही रुतली माया,
कृतार्थ जीवन झाले.
गर्भातुन कोवळे धरेच्या,
कोंब तरारुन आले.

©Archana Pol मेघ सावळा
भाळावरुनी मेघ सावळा,
कृष्णनभाच्या आला.
क्षण भेटूनी मनास माझ्या,
मृदगंधाचा गेला.

तरारलेला थेंब टपोरा,
विसावलेला भाळी,
स्पर्शासाठी आतुरलेली,
अधीर धरणी काळी.

प्रणय सुखाच्या आठवणींनी,
रोमांचित तन ओले.
स्पर्श लाजरा मनात दाटे,
अधर गुलाबी झाले.

मेघ सावळे उतरुन रानी,
सुगंध पसरत  गेले.
धुंद मोहरुन आली काया,
भिजले तनमन ओले.

अवघ्या देही रुतली माया,
कृतार्थ जीवन झाले.
गर्भातुन कोवळे धरेच्या,
कोंब तरारुन आले.

©Archana Pol मेघ सावळा
archanapol5687

Archana Pol

New Creator

मेघ सावळा #मराठीकविता