Nojoto: Largest Storytelling Platform

भावनांचा तो बांध ही फुटला नात्याचा तो बंध ही तुटल

भावनांचा तो बांध ही फुटला 
नात्याचा तो बंध ही तुटला  
कळलेच नाही तुला कधी 
जीव ही माझा का गुरफटला?

बंधन दिलेस तू वचनांचे 
स्वार्थासाठी खोट्या प्रेमाचे 
कळलेच नाही तुला कधी 
भाव माझ्या लोचनांचे 

हृदयांतरी या प्रेमरंगाचे  
गुलाब फुलले होते प्रितीचे 
कळलेच नाही तुला कधी 
ठोके माझ्या स्पन्दनांचे 

प्रतिबिंबातही तुलाच पाहिले 
मनोमनी सर्वस्व वाहिले 
कळलेच नाही तुला कधी 
प्रेमात तुझ्या मी न माझी राहिले 

अस्तित्व माझे हरवून बसले 
तुझ्या भूलथापांना मी फसले 
कधीच कळणार नाही तुला 
एक फूल तुझ्यामुळे हिरमुसले 
एक फूल तुझ्यामुळे हिरमुसले 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk
  #L♥️ve 
#Love 
#sadness 
#SAD
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator