Nojoto: Largest Storytelling Platform

नाते असे असावे ज्यात सुख दुःख हक्काने सांगता आलं प

नाते असे असावे ज्यात
सुख दुःख हक्काने सांगता आलं पाहिजे 
आणि हक्क इतके असावे ज्यात
आपलं समजून काहीही मागता आलं पाहिजे...

नाते असे असावे ज्यात गैरसमज झाले तरी
ते दोघातच दूर करता आलं पाहिजे 
आयुष्यभर सारं काही दोघांनाच करायचं असतं
म्हणून काही वेळा दुर्लक्ष करता आलं पाहिजे...

नात्यात तुझं माझं कधीच नको
नेहमी आपलं बोलता आलं पाहिजे 
लहान लहान गोष्टींवर रुसण्यापेक्षा
चांगलं शोधून आनंदी जगता आलं पाहिजे...

समाज चुका शोधेलच आपल्या नेहमी 
म्हणून स्वतःच्या आनंदाचा विचार केलं पाहिजे 
विचार केलं तर खूप छोटसं आहे आयुष्य 
मिळालं तेवढ्यात भरभरून प्रेमानं जगता आलं पाहिजे....

अजूनही जात पात पैसा संपत्ती च्या पलीकडे लोकं जात नाही
तेव्हा लोकांना खरं प्रेम काय असतं ते कळलं पाहिजे 
आनंदी राहण्यासाठी काहीतरी त्यागायचं असतं
फक्त त्यासाठी मन निर्मळ ठेवून प्रयत्न केलं पाहिजे....!!

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Trip