Nojoto: Largest Storytelling Platform

त्या भेटीची आठवण.... आज जाताना ती काहीच कश


       त्या भेटीची आठवण....
आज जाताना ती काहीच कशी बोलली नाही
कधी केलाच फोन  तर बोलणं तिचं  कमी नाही
आज ती जास्त असं काही बोलली सुद्धा नाही
आज तिने जाताना वळून सुद्धा पाहिलं नाही...

कितीतरी दिवसांनी आज आम्ही भेटणार होतो
 समोरासमोर भेटून जास्त कधी बोललो नव्हतो
आज ती भेटणार म्हणून आस मनाला लागली 
त्या होणाऱ्या भेटीची मनात मी स्वप्न सारी रंगवली

ठरवलं होतं आज तिला सर्व मनातलं सांगेन
तिच्यावर असलेलं प्रेम आज शब्दात व्यक्त करेन
पण तिला असंशांत पाहून मी सुध्दा शांत झालो
आज ती अशी शांत का याच विचारात मी बुडून गेलो..
 
जाताना तुझ्या अबोल्याच कारण तरी सांगून जायचं
 तुझ्या अबोल्याचं नेमक मी कोणत कारण समजायचं
 तुला काही बोलायचं नव्हतं तर भेट तरी का ठरवली
या एका भेटीची आठवण माझ्या कायम मनात राहीली....

         ओंकार भुवड......✍️
       9657975808

©OMKAR BHUVAD
  ऋणानुबंध...
omkarbhuvad4832

OMKAR BHUVAD

New Creator

ऋणानुबंध... #मराठीकविता

87 Views