Nojoto: Largest Storytelling Platform

सदा धावते का ?..... (भुजंगप्रयात/२०/लगागा/४)

सदा धावते का  ?..... 

(भुजंगप्रयात/२०/लगागा/४) 

उदासीन सखये अशी वागते का  ? 
वसंतातला हा बहर टाळते का  ? 

तुझी ही नजर जीव घायाळ करते
अशी हासण्याने जिवे मारते का  ? 

तुला दृष्ट लागेल नक्कीच सखये
धवल मोगर्‍याची फुले माळते का ? 

सखे काळजाचे चुकावेत ठोके
तुझे रूप मजला उगी भावते का  ? 

कळ्या कुंद ओल्या सुगंधी फुलांच्या
दिठी पापण्यांचे सुमन लाजते का  ? 

तुझ्या पैंजणानी तृणे मुग्ध झाली
सहज बोलता बासरी वाजते का  ? 

मुलायम किती हे तुझे पाय सखये
तरी लगबगीने सदा धावते का  ?

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh सदा धावते का

#feellove
सदा धावते का  ?..... 

(भुजंगप्रयात/२०/लगागा/४) 

उदासीन सखये अशी वागते का  ? 
वसंतातला हा बहर टाळते का  ? 

तुझी ही नजर जीव घायाळ करते
अशी हासण्याने जिवे मारते का  ? 

तुला दृष्ट लागेल नक्कीच सखये
धवल मोगर्‍याची फुले माळते का ? 

सखे काळजाचे चुकावेत ठोके
तुझे रूप मजला उगी भावते का  ? 

कळ्या कुंद ओल्या सुगंधी फुलांच्या
दिठी पापण्यांचे सुमन लाजते का  ? 

तुझ्या पैंजणानी तृणे मुग्ध झाली
सहज बोलता बासरी वाजते का  ? 

मुलायम किती हे तुझे पाय सखये
तरी लगबगीने सदा धावते का  ?

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh सदा धावते का

#feellove

सदा धावते का #feellove #मराठीकविता