Nojoto: Largest Storytelling Platform

*काव्यलेखन विषय:-सुखाच्या सरी* काव्य शीर्षकःआयुष्य

*काव्यलेखन विषय:-सुखाच्या सरी*
काव्य शीर्षकःआयुष्य हे पुन्हा नाही

खडतर वाट पार करीत
असताना येते दुःखाची दरी,
धाडसाने न डगमगता चालावे 
आपोआप येते सुखाची सरी..१

अशा अनेकानेक येत राहतील
बरसतील सुखाच्या सरी जीवनात, 
आनंद घेत राहावे क्षणोक्षण
आयुष्य हे पून्हा नाही विश्वात...२

बेधडक बेधुंद होऊन नाचूया
गाऊया छान शब्दांचे गीत,
तव जगण्याचा आनंद मिळेल 
तालसुरांच्या शब्दात ही सुखाची प्रीत...३

जीवनात अनेक कार्य करण्यास
संघर्षमय कष्टाची असावी जोड,
सुख दुःख हे वाट्याला येतच राहतील 
कर्म निःस्वार्थात शब्द असावेत गोड...४

मृत्यूनंतरचे आयुष्य कोणी न पाहिले?
घ्यावे जगूनी बरसतील सुखाच्या सरी,
दुःख जरी येता कमजोर न व्हावे
शेवटी आयुष्याचे गणित हे लहरी...५
*************************
✒कवी श्री.शंकर सुतार, 
वरवडे,जिल्हाःसोलापूर.
*************************

©शंकर
  #आयुष्य