Nojoto: Largest Storytelling Platform
shankar4839
  • 9Stories
  • 10Followers
  • 117Love
    891Views

शंकर

कवी शंकर सुतार

  • Popular
  • Latest
  • Video
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

*व्यसन* 

वाईट व्यसन व्यसनांधा
नको पिऊस रे दारू,
नाराज राहत असेल 
तुझीच लाडाची पारू...१
 
काय मिळते तुला 
सतत दारू पिऊन,
स्वतःचीच संपत्ती तु 
बघ बसशील जिरवून...२

पैशांसाठी लढवतो तूच 
संसारात खोटी शक्कल,
तोंडावर पडल्यावर मग 
निघते तुझीच रे अक्कल...३

व्यसन करू नकोस
माणसा आयुष्यात बरं,
तुझंच नुकसान होतय
हे मात्र अगदी खरं...४

एकच प्याला घात करेल 
क्षणोक्षण समज यावा तुला,
व्यसनमुक्ती केंद्र ठेवलेला
असेल तुझ्यासाठी खुला...५

*कवी शंकर सुतार, पुणे......✍

©शंकर #व्यसनमुक्ती काव्यलेखन
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

तू फक्त माझीच 

माझ्या जीवनात तुझ्या
शिवाय कुणीच नसावं,
ह्रदयातुन सांगतो प्रिये
तू फक्त माझीच रहावं.

मला तुझी येत राहील
क्षणाक्षणात आठवण,
झालेल्या प्रेम भेटीची
केली अश्रूंची साठवण.

मी कुठं म्हणतोय की
माझ्या मुळे तु रडावं,
नयनी पापणीत मात्र 
ओले होऊन भिजावं.

माझ्या मनी ध्यानी तूच
प्रेमाच्या हृदयी वसावं,
तू माझी राणी आहेस
मी राजासारखा दिसावं.

मला तुझी सोबती आहे
तुझी काळजी घेणार, 
तु फक्त माझीच आहेस
अन मी तुलाच साथ देणार.

कवी शंकर सुतार..

©शंकर #ValentinesDay
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

*काव्यलेखन विषय:-सुखाच्या सरी*
काव्य शीर्षकःआयुष्य हे पुन्हा नाही

खडतर वाट पार करीत
असताना येते दुःखाची दरी,
धाडसाने न डगमगता चालावे 
आपोआप येते सुखाची सरी..१

अशा अनेकानेक येत राहतील
बरसतील सुखाच्या सरी जीवनात, 
आनंद घेत राहावे क्षणोक्षण
आयुष्य हे पून्हा नाही विश्वात...२

बेधडक बेधुंद होऊन नाचूया
गाऊया छान शब्दांचे गीत,
तव जगण्याचा आनंद मिळेल 
तालसुरांच्या शब्दात ही सुखाची प्रीत...३

जीवनात अनेक कार्य करण्यास
संघर्षमय कष्टाची असावी जोड,
सुख दुःख हे वाट्याला येतच राहतील 
कर्म निःस्वार्थात शब्द असावेत गोड...४

मृत्यूनंतरचे आयुष्य कोणी न पाहिले?
घ्यावे जगूनी बरसतील सुखाच्या सरी,
दुःख जरी येता कमजोर न व्हावे
शेवटी आयुष्याचे गणित हे लहरी...५
*************************
✒कवी श्री.शंकर सुतार, 
वरवडे,जिल्हाःसोलापूर.
*************************

©शंकर
  #आयुष्य
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

अभंग रचना
🌹 *विषय - वरदान* 🌹
शीर्षक-भक्त हनुमान 

प्रभू श्रीरामांनी ।
दिले वरदान ।
भक्त हनुमान ।
भाग्यवंत ॥०१॥

पवनसूत तो ।
जय हनुमान ।
असे भाग्यवान । 
रामदूत॥०२॥

वज्र हनुमान ।
अंजनीचा सुत ।
थोर रामदूत ।
अलौकिक ॥०३॥

संकटमोचन ।
जय हनूमंता ।
दूर करी चिंता ।
भक्तांची ती ॥०४॥

बजरंगबली ।
करूया गजर।
सेवेत हजर ।
भक्तगण ॥०५॥

नित्य स्मरणात ।
घेताच दर्शन।
सुखावते मन।
सदोदित ॥०६॥

भक्तिभाव मंत्र।
हे जय श्रीराम ।
घ्यावे सदा नाम ।
मुखातून ॥०७॥
-------------------------
कवी श्री.शंकर सुतार.

©शंकर #hanumanjayanti
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

*काव्यलेखन*
*****************************
शीर्षकः चला जगात मराठी भाषा रूजवूया
**************************
बाराखडीच्या शब्दांनी सजलेली
चला मना मनात रुजवूया मराठी,
अक्षर हेच प्रोत्साहन देत राहतात 
सुंदर मराठी भाषेची व्हावी भरभराटी...१

मराठी भाषा जगात प्रसिद्ध करूया 
मातृभाषेला देऊ नका कधी अंतर मनात, 
गर्व असावा आपल्या माय मराठीचा
मराठी भाषेला मिळो सन्मान क्षणात...२

मराठी भूमीत जन्माला आलोत
याचा मनापासून असावा अभिमान, 
लिहावी,वाचावी,बोलावी भाषा
 भारत देशात भाषा आहेत महान...३

वाचावी थोर संतांची मराठी भाषा
अक्षरांची खुपच छान आहे लेखणी,
चला जगात मराठी भाषा रूजवुया  
साहित्यिकांची मराठी भाषा देखणी...४

*************************
कवी श्री.शंकर सुतार,
वरवडे, जिल्हाः सोलापूर.

©शंकर
  मराठी भाषा

मराठी भाषा #मराठीकविता

228 Views

51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर


✒
 *कविता लेखन* 

*शीर्षकः नम्रतेने जिंकावे मन*

गर्विष्ठ मनुष्याला असतोय
अनेक गोष्टीचा अहंकार, 
आयुष्याच्या वाटेवर दिसतो
मी पणाचा अंध:कार ...१

अंधार गर्वाचा दूर होण्यास 
नम्रतेने जिंकावे मन, 
जगण्यास अर्थ मिळेल 
गवसतील आनंदाचे क्षण...२

जीवनातल्या क्षणी माणसा
कर्मात कर नम्रतेची भर,
स्वभावात असेल जर नम्रता 
तर करतील सारे तुझी कदर...३

कदर नम्र गुणाची होताना
वाढेल सन्मान क्षणोक्षण,
गर्विष्ठ प्रवृत्ती पासून सर्वदा
दुर राहिल्यास मिळेल हर्षाचे क्षण...४

मनोमन विचार करून 
द्यावा स्वभावास नवा आकार,
नको गर्विष्ठ कर्माचे क्षण
नम्रतेत आहे जीवनाचा सार...५

✒कवी श्री.शंकर सुतार, पुणे...,
मोबाईल क्र. ९८८१३५५३१७.

©शंकर
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

नम्र भाषा ✒

       समाजात काम करीत असताना कोणत्याही व्यक्तीची बोलण्याची भाषा हि नम्र,निर्मळ असावी. कोणालाही मानसिक त्रास देणारी नसावी.आपल्या स्वतःच्या वाईट बोलण्यामुळे इतर कोणाला त्रास होत आहे का ? ... याचा मनोमन विचार करणे अत्यंत आवश्यक असते. समाजात खुप वाईट बोलणारे व्यक्ती आहेत.अशा व्यक्तींच्या भाषेत कधीच फरक पडत नाही. अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष केलेलंच बरं !..
        समाजात दुसर्‍यांना वाईट बोलणार्‍या व्यक्तीला आपल्याच स्वतःच्या वाईट भाषेचा तिरस्कार जाणवत नाही.अशा विकृत व्यक्तींच्या विचारात एकदम खालच्या दर्जाची भाषा असते.अशा व्यक्तीवर संस्कार हे लहानपणापासून वाईटच झालेले असतात.त्यामुळे अशा व्यक्तींची भाषा कधीच सुधारणारी नसते,अशा विकृत विचारांच्या व्यक्तींची भाषा हि इतकी वाईट भाषा असते की,त्यांच्या स्वतःची भाषा हि किती खालच्या पातळीची आहे.हे त्यांना स्वतःला ही कधीच समजणारी नसते.समोरच्या कोणत्याही व्यक्तीला
आपण काय बोलतो आहोत!.याचा मनोमन विचार करीत नाहीत.
      समाजात कुठेही काम करीत असताना आपलाच सहकारी व्यक्ती तिसऱ्या व्यक्ती समोर त्याच्याच सहकारी व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देत असतो, असे कदापि करू नये.अन्यथा, अनपेक्षित पणे वाईट वेळ येऊ शकते. म्हणजे वाईट कर्माचे फळ वाईटच मिळत राहते.
     सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, चांगला विचार करून नेहमी नम्र,प्रेमळ भाषाच स्वतःच्या ओठी असावी लागते.
       सहकाऱ्यांना सोबत घेऊन विजयाचा आनंद नक्कीच साकार करता येऊ शकतो,परंतू भाषा हि प्रेमळ असावी.भाषेमध्ये नम्रता असावी.सहकाऱ्यांनाच अपमानास्पद वागणूक देणारी नसावी.

©शंकर #pen
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

*विषयः अष्टाक्षरी चारोळी लेखन* 🌹
शीर्षकः गुलाब 

माझे तुझ्यावर प्रेम
संदेश देई गुलाब, 
प्रियकर प्रेयसीचा
वाढे प्रेमळ रूबाब.

©शंकर #Starss
51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

नीलकाव्य चारोळी
 
विषयः नातं अतूट मैत्रीचं
शीर्षकः विश्वास 

खरे मित्रप्रेम देई
संकटात साथ,
नातं अतूट मैत्रीचं...!
विश्वासाने फुलत राही प्रेमात.

©शंकर निलकाव्य चारोळी

#friends

निलकाव्य चारोळी #friends #मराठीकविता

3 Love

51d9c562b10f2d8d23f9fcb534ca5bb4

शंकर

🌹शब्द चारोळीपुष्प🌹 
✒विषयः प्रीत

साथ सूरांना मिळवून
येई ओठांवर छान गीत, 
भावनांची गुंफण होऊन
बहरते तव प्रेमाची प्रीत.

©शंकर प्रीत 💟

प्रीत 💟

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile