Nojoto: Largest Storytelling Platform

कधी हसायचं ,कधी रडायचं त्यातून काहीतरी शिकायचं.. श

कधी हसायचं ,कधी रडायचं
त्यातून काहीतरी शिकायचं..
शिकलेल्या अनुभवानीं 
आयुष्याला जिंकायचं..

चुकलेल्या गोष्टींना
हसत हसत सोडायचं..
तुटलेल्या गोष्टींना
मोठ्या मनानं जोडायचं..

चुकांमधून शिकत शिकत
त्यातून काहीतरी घडायचं..
हसत खेळत प्रत्येकवेळी 
आनंदाला शोधायचं ..

हसत खेळत प्रत्येकवेळी
आनंदाला शोधायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  Aanand