Nojoto: Largest Storytelling Platform

ऋतू बेभान.... सुख शांतीचे आवार, त्यात बरसला अंगार

ऋतू बेभान....

सुख शांतीचे आवार, त्यात बरसला अंगार
न जाणे काय होते, त्याच्या मनीचे विचार..
  
एकाएकी नभी येती, कृष्णमेघांचे आरव
नको कोसळू तू फार, तुज हस्तांचे आर्जव..

पण पाऊस पाऊस, गेला धरेवर ऊतू
शिवारात , अंगणात, कोपला धुंद ऋतू..

धुंदीची बरसात, मस्तीचा गडगडाट
थेंबांच्या घुंगरांनी, वनी केला थयथयाट..

कुठे आभाळ फुटलं, घर डुंबले पाण्यात
येता-जाता दिसणारे, ओढे झाले मदमस्त..

कुठे डोंगर खचले, कुठे माथा कोसळला
असा कसा पावसा, सारा डावच मोडला..

आला आला महापूर, गेला पसारा वाहून..
काळया मातीतलं सोनं,  गेलं मातीत विरून..

नको होऊ तू बेभान, जरा घे ना विसावा
थोड्या थोड्या अंतराने, दे मायेचा ओलावा

लडिवाळ ये असा, घाल मनाला फुंकर
तुझ्या येण्याची मला, लागुदे हुरहूर..
लागुदे हुरहूर....

अमिता✍️

©Amita ऋतू बेभान
ऋतू बेभान....

सुख शांतीचे आवार, त्यात बरसला अंगार
न जाणे काय होते, त्याच्या मनीचे विचार..
  
एकाएकी नभी येती, कृष्णमेघांचे आरव
नको कोसळू तू फार, तुज हस्तांचे आर्जव..

पण पाऊस पाऊस, गेला धरेवर ऊतू
शिवारात , अंगणात, कोपला धुंद ऋतू..

धुंदीची बरसात, मस्तीचा गडगडाट
थेंबांच्या घुंगरांनी, वनी केला थयथयाट..

कुठे आभाळ फुटलं, घर डुंबले पाण्यात
येता-जाता दिसणारे, ओढे झाले मदमस्त..

कुठे डोंगर खचले, कुठे माथा कोसळला
असा कसा पावसा, सारा डावच मोडला..

आला आला महापूर, गेला पसारा वाहून..
काळया मातीतलं सोनं,  गेलं मातीत विरून..

नको होऊ तू बेभान, जरा घे ना विसावा
थोड्या थोड्या अंतराने, दे मायेचा ओलावा

लडिवाळ ये असा, घाल मनाला फुंकर
तुझ्या येण्याची मला, लागुदे हुरहूर..
लागुदे हुरहूर....

अमिता✍️

©Amita ऋतू बेभान
asj6456746298564

Amita

New Creator

ऋतू बेभान #मराठीकविता