Nojoto: Largest Storytelling Platform

आकाश ही निळे॥ निळा हा सागर॥ प्रितीची घागर॥ चला भरु

आकाश ही निळे॥ निळा हा सागर॥
प्रितीची घागर॥ चला भरु॥१॥

श्रावणात आल्या॥ बेसुमार सरी॥
आनंद हा तरी॥ किती झाला॥२॥

जशी मोहनाची ॥ मुरली वाजते॥
कानात घुमते ॥ सुर तिचे॥ ३॥

नारळी पोर्णिमा ॥ आहे तिची वाट॥
करेल पहाट॥ कोळीगीत ॥४॥


मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #अंकित