Nojoto: Largest Storytelling Platform

शीर्षक:आजीचा बटवा आजीचा बटवा हा चमत्कारिक आहे ब


शीर्षक:आजीचा बटवा

आजीचा बटवा
हा चमत्कारिक 
आहे बघा त्यात
काजू नी खारीक १

वाटतो खजिना
आजीचा बटवा
मजला मायेचा
भासतो तो ठेवा  २

कैक आठवणी
त्यात भरलेल्या
कडा नयनांच्या 
कशा ओलावल्या ३

आजीचा बटवा
बघता ये वेळा 
गहिवर येतो
फुटतो उमाळा     ४

जणू काही असे
औषधी खजिना
आणीबाणी वेळी
मदत सर्वांना       ५

लिमलेट गोळ्या
घालुया मुखात 
संगे वेलदोडे
नांदती सुखात     ६

©somadatta kulkarni
  आजीचा बटवा

आजीचा बटवा #मराठीकविता

27 Views