Nojoto: Largest Storytelling Platform

सुप्रिया तुझ्या विरहात सुप्रिया आम्हा सर्वांना प्र

सुप्रिया तुझ्या विरहात
सुप्रिया आम्हा सर्वांना प्रिय
का घेतलास निर्णय अप्रिय
बापाचं तर विश्वच हरवलय ग
एवढे दिवस झाले तुला  जाऊन !
बाप !तुटलाय ग खूपच
आतून !
नाही विसरू शकत तुझ्या
आठवणी !
आईच्या डोळ्यात अखंड
पाणी !
लहान भाऊ !ताईच्या मायेला
झालाय पारखा !
एकदा तरी आमचा विचार
मनात नाही आला ?
आमच्या प्रेमापेक्षा दुःख मोठ
वाटलं का तुला !
चैतन्य ,आनंद , सगळ तर तूच
जगण्यातला !
तुझ्या विरहान पूर्ण परिवार
अगतीक झाला .

 आठवणीने व्याकूळ अशा वडिलांच्या भावना व्यक्त
केल्याय . ही शब्द सुमने
सुप्रियाला समर्पित करते .
        प्रिया डाखोडे

©Mohan Somalkar
  # वेदना

# वेदना #मराठीकविता

135 Views