Nojoto: Largest Storytelling Platform

जे काही मिळवायचं होत ते आज मिळून गेलं.. पण आज पुन

जे काही मिळवायचं होत 
ते आज मिळून गेलं..
पण आज पुन्हा एकदा
जगायचं राहून गेलं..

ज्याला जे सांगायचं होत
ते आज सांगून झालं..
पण स्वतःच्या मनाचं 
ऐकायचं राहून गेलं..

जिथपर्यंत चालायचं होत
ते आज चालून झालं..
पण थांबायचं कुठ नेमकं 
ते आज राहून गेलं..

मरायचं जेव्हा होतं 
ते आज मरण आलं..
उद्याच्या चिंतेत मात्र
आज जगायचं राहून गेलं..

उद्याच्या चिंतेत मात्र 
आज जगायचं राहून गेलं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  जोकर