Nojoto: Largest Storytelling Platform

काव्य लेखन उपक्रम विषय- नाही क्षणाचा भरवसा प्रत्


काव्य लेखन उपक्रम
विषय- नाही क्षणाचा भरवसा

प्रत्येकाची लढाई येथे  फक्त जगण्यासाठी
जाण असूनही काही क्षणांचा भरवसा नाही

पाप पुंण्याचें हिशोब सगळे व्यर्थ येथे
धावपळीच्या चुरसी खेळात जराही उसासा नाही

जीवनात सकर्मक माणसाची नियती दाखले देते 
प्रतिबिंब बदलेल असा जगात कोठे आरसा नाही

कर्माचे भोग जरी देती दृष्टान्त वेळोवेळी
मरणानंतर त्याचा कुठेही खुलासा नाही

अपव्यय भावनांचा सदा नात्यात स्थिरावतो
आप्तेष्टांना वर्तनी थोडासा ही दिलासा नाही

परित्याग केला जरी या सुखाचा निःसंकोचपणे
दुःखाला सामोरे जावे तिळमात्र भरोसा नाही

श्री अनंत पांडुरंग पाटील
उमरोळी पालघर
8446819452

©अनंत पाटील
  माझ्या कविता

माझ्या कविता #मराठीशायरी

24,461 Views