Nojoto: Largest Storytelling Platform

मौनी. . हिंदू हिंदू म्हणजे कोण हो? मुस्लीम म्हणजे

मौनी. .

हिंदू हिंदू म्हणजे कोण हो?
मुस्लीम म्हणजे कोण हो?
जातपात बोलत जाते 
माणूस मात्र मौन हो!

काट्या चिवट्या टोचूनटोचून
बनतात पत्रावळ्या द्रोण हो!
चवीपुरते हवे तिखट मीठ
आम्ही मिसळतो शेण हो!

प्रेमाचा अत्युच्च अलंकार देह!
ही नाही नुसती चैन हो..
निसर्गाची सर्वां सारखी माया 
लक्षणे ही का करता गौण हो?

हिंदू हिंदू म्हणजे कोण हो?
मुस्लीम म्हणजे कोण हो?
जातपात बोलत जाते 
माणूस मात्र मौन हो!

#दिबा

©Dileep Bhope