Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांच्या शहरांत झाली तिची भेट अनोळखी असूनही आप

स्वप्नांच्या शहरांत
झाली तिची भेट
अनोळखी असूनही
आपली वाटली थेट

वाटलं जाऊन तिला
मनातलं सांगावं
तिच्याकडुन स्वतःसाठी
फक्त तिलाच मागावं

काय देईल उत्तर
याचं न ठेवता भान
थोडा तरी माझ्या प्रश्नाचा
ठेवेल का ती मान?

काय माहित
काय होईल ,
गाडी आपली
कुठवर जाईल !!

प्रेम करता करता
काय होईल यार  ,
प्रेमाच्या या दुनियेत
होईल का नय्या पार !!

स्वप्नांच्या शहरातून
जेव्हा सत्यात येईल थोडी ,
तेव्हाच जमवून पाहिल
आमच्या प्रेमाची मी गोडी  !!

©Neeraj Shelke
  #mrwriter #writer✍ #shayardil❤ #kavita #poem✍🧡🧡💛 #poemwrittenbyme

#mrwriter writer✍ shayardil❤ #kavita poem✍🧡🧡💛 #poemwrittenbyme #मराठीकविता

110 Views