Nojoto: Largest Storytelling Platform

#सहजच_मनातलं सेल्फिचा हा कॅमेरा किती गोड बोलतो

#सहजच_मनातलं 

सेल्फिचा हा कॅमेरा 
किती गोड बोलतो ना आपल्याशी?
डोळ्यांखालची वर्तुळे
हलक्या हलक्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या
आणि कपाळावरच्या ह्या आठ्या....
एका क्षणात दूर करतो...

खरंतर हाच चेहरा आवडतो मला
इतरांना दाखवायला
बरंच काही लपवता येतं
झाकता येतं आणि...
खोटं खोटं हसताही येतं...

तुझं हे खोटंपण
थोडं शिकव की जरा या आरश्याला
सारखी सारखी काय खुरटी दाढी
कुण्या काळचं करपलेपण 
दाखवत राहतो उगाच...

नेमक्या वर्माच्या जागा दाखवत बसतो
माझं खुजंपण, माझं न्यूनत्व 
ठळकपणे दाखवत बसतो
माझ्या डोळ्यात पडलेल्या टीका
मागे सरकत जाणारं कपाळ
बेढब होत जाणारं रूपडं...

शिकव रे याला
कसे लावायचे असतात फिल्टर
कशा लपवायच्या असतात 
बदलत्या गरजांनुसार सेटिंग 

शिकव याला जरा 
कसं वाढवायचं ब्राईटनेस एक्सपोजर
आणि कसे गुळगुळीत करायचे 
वास्तव अगदी इव्हन एकसारखे...

पण तो ऐकणार नाही
खडूस, हट्टी आहे साला
तो हसतोय बघ छद्मी 
जाऊ दे सोड त्याला....

©Sandip Raut
  सेल्फी चा हा कॅमेरा
sandipraut5341

Sandip Raut

New Creator

सेल्फी चा हा कॅमेरा #मराठीकविता #सहजच_मनातलं

307 Views