Nojoto: Largest Storytelling Platform
sandipraut5341
  • 11Stories
  • 24Followers
  • 74Love
    3.4KViews

Sandip Raut

Writer, reader and a human being.

  • Popular
  • Latest
  • Video
588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

गुलाब द्यायचे कशाला
अंतरंगी किती बहरलो
शब्दांची ही गरज कशाला
तुझ्यात आरपार शिरलो

©Sandip Raut
  गुलाब द्यायचे कशाला?

गुलाब द्यायचे कशाला? #मराठीकविता

270 Views

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

काही अनुबंध

©Sandip Raut
  काही अनुबंध...

काही अनुबंध... #मराठीकविता

127 Views

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

बेटियां नहीं है नसीब में
मलाल हर रोज होता है 
झरना होती हैं बेटियां 
कैसे किसीको बोझ होता है

उनकी खिलखिलाती हंसी
उनमें छुपी मां की लोरिया
उनका प्यारासा बचपना
बहनों में छुपी समझदारिया

नसीबवाले होते हैं सचमे
जहां छांव होती हैं ऐसी 
नजरोंमें सिर्फ बेटियां दिखे
खुदा नज़र दे मुझे वैसी 

- संदीप राऊत

©Sandip Raut
  #Betiyan #doughterslove
588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

कसा सोडवावा हात?

©Sandip Raut कसा सोडवावा हात??

कसा सोडवावा हात?? #मराठीकविता

6 Love

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

त्यांचे कामच आहे बोलणे
वाद घालणे पेटवणे
मेंढ्यांचे कळप चालवणे
मेंदू कुजवणे नासवणे
तुझ्या हाती असू दे पुस्तक
हाती असू दे लेखणी
डोळे उघडे ठेव कान उघडे
असू दे संयमी स्पष्ट वाणी
साऱ्याच वटवृक्षाची 
छाया असते शितल 
साऱ्याच महासागराची
खोली असते अनंत
शूद्र असते आपलीच ओंजळ
अन् असते फाटकी झोळी
होईल तितका गिरवू कित्ता
भिनवू महान विभूतींच्या ओळी

©Sandip Raut #Winters
588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

सहज सुचावी ओळ शेवटी 
अन् कविता जशी बहरून यावी 
तुझ्या येण्याने माझ्या ठायी
वेल सुखाची तशी बहरून यावी

©Sandip Raut #hands तुझ्या येण्याने...

#hands तुझ्या येण्याने... #मराठीप्रेम

6 Love

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

नित्य नवा कोरा असतोस तू
या अगम्य आकाशासारखा 
कधी कमालीचा नितळ निरभ्र
कधी गूढ ढगांनी भारल्यासारखा

©Sandip Raut #Road तू....
588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

फुले भगवी 
पाने हिरवी
आकाश निळे
धरा सावळी

©Sandip Raut #flowers फुले भगवी

#flowers फुले भगवी #मराठीकविता

6 Love

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

तीच चैतन्य तीच रणरागिणी
तीच आई, सखी न भगिनी
तीच सळसळती तलवार कधी
तीच ढाल तीच तेवते वृंदावनी 
संदीप राऊत

©Sandip Raut
588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

#सहजच_मनातलं 

सेल्फिचा हा कॅमेरा 
किती गोड बोलतो ना आपल्याशी?
डोळ्यांखालची वर्तुळे
हलक्या हलक्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या
आणि कपाळावरच्या ह्या आठ्या....
एका क्षणात दूर करतो...

खरंतर हाच चेहरा आवडतो मला
इतरांना दाखवायला
बरंच काही लपवता येतं
झाकता येतं आणि...
खोटं खोटं हसताही येतं...

तुझं हे खोटंपण
थोडं शिकव की जरा या आरश्याला
सारखी सारखी काय खुरटी दाढी
कुण्या काळचं करपलेपण 
दाखवत राहतो उगाच...

नेमक्या वर्माच्या जागा दाखवत बसतो
माझं खुजंपण, माझं न्यूनत्व 
ठळकपणे दाखवत बसतो
माझ्या डोळ्यात पडलेल्या टीका
मागे सरकत जाणारं कपाळ
बेढब होत जाणारं रूपडं...

शिकव रे याला
कसे लावायचे असतात फिल्टर
कशा लपवायच्या असतात 
बदलत्या गरजांनुसार सेटिंग 

शिकव याला जरा 
कसं वाढवायचं ब्राईटनेस एक्सपोजर
आणि कसे गुळगुळीत करायचे 
वास्तव अगदी इव्हन एकसारखे...

पण तो ऐकणार नाही
खडूस, हट्टी आहे साला
तो हसतोय बघ छद्मी 
जाऊ दे सोड त्याला....

©Sandip Raut
  सेल्फी चा हा कॅमेरा

सेल्फी चा हा कॅमेरा #मराठीकविता #सहजच_मनातलं

307 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile