Nojoto: Largest Storytelling Platform

शाळेत बसून जेवणाचा आनंद आज मिळत नाही... आठवताना क

शाळेत बसून जेवणाचा 
आनंद आज मिळत नाही...
आठवताना क्षण सारे 
घास घशाखाली गिळत नाही..

चपाती सोबत गुळाचा खडा
किती भारी लागायचा..
भाजी नसते म्हणून गूळ 
डब्यात नेहमी आणायचा..

एकमेकांना सोबत घेऊन
घोळका गोल करायचा..
चटणी भाकर वाटत वाटत
एक एक घास मिळायचा..

उच्च नीच लहान मोठा
 भेद मुळीच नसायचा..
 शाळेतल्या प्रत्येक दिवसात
खरा आनंद असायचा..

शाळेतल्या प्रत्येक दिवसात
खरा आनंद असायचा..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  शाळा