Nojoto: Largest Storytelling Platform

संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये.

संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.

©DJ song
  #Nightlight #Nojotoshayeri✍️ #marathivastushastra #moremarathi #Share_type #paisa  #dhan #dhanvan