Nojoto: Largest Storytelling Platform

गौरी आगमन गौरी आगमन | सोन्याच्या पाऊली धनाची साव

गौरी आगमन

गौरी आगमन | सोन्याच्या पाऊली 
धनाची सावली | देतअसे ||1

स्वागत जोरात | करु सांजवेळी 
घालुया रांगोळी | स्वागताला ||2

दोन दिवसाच | माहेराला येती 
धन धान्य देती | बंधुराजा ||3

जेवनाचा मान| अंबाडी न सांजा 
किती गाजावाजा | गौराईचा ||4

पान ग सजले | दिव्याची आरास 
धन्याची ग रास | सोबतीला ||5

ओवाळु आरती | तिन्ही सांजवेळी 
प्रसादाला केळी | ठेवुनिया ||6

पुरणाची पोळी | पक्वान हे सोळा 
मंडळी ही गोळा | आरतीला ||7

द्यावा आशिर्वाद | सुख समाधान 
शेतातले वाण | वृद्धि होवो ||8

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  गौरी आगमन

गौरी आगमन #मराठीकविता

27 Views