Nojoto: Largest Storytelling Platform

समजून घे दोस्ता तूच स्वतःला सावरायला हवं अस्तित्

समजून घे दोस्ता

तूच स्वतःला सावरायला हवं 
अस्तित्व नव्याने उभारायलं हवं
विचार कर समजून घे दोस्ता 
तुझं जग तूच उभार आता नवं ||१||

निसर्ग दोस्त तुझा दुश्मन कधी झाला 
महापूर होऊन मग तो गावात विसावला 
हद्द त्याची गिळंकृत तूच तर केली ना!
तुझ्या सारखा मोकळा श्वास घेऊ दे त्याला  ||२||

महामारी आली सांग तरी कशाने 
किती पशू संपवले अन्न म्हणून माणसाने 
तरीही मार्ग तुला थोडा काही ठेवला 
अस काय बिघडणार त्यांच्या जगण्याने ||३||

डोंगर जरा सैल झाले नेहमी प्रमाणे 
छोट्या टेकड्या सांभाळत होत्या पुर्वी 
त्यांचे अस्तित्व सांग कुठे गडप झाले 
जंगल झाडी त्यांची दाटी दाखव हिर्वी ||४||

तुझा विकास हवा तेवढा कर पण 
आमच्या जगण्याचं भान थोडं ठेव 
आरसा घेऊन आता तरी बघ स्वतःला 
तुझ्यातला जागा कर माणुसकीचा देव ||५||

विचार कर समजून घे दोस्ता 
विचार कर समजून घे दोस्ता 

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #समजून_घे_दोस्ता,  #पंडित_निंबाळकर 
#कविता
समजून घे दोस्ता

तूच स्वतःला सावरायला हवं 
अस्तित्व नव्याने उभारायलं हवं
विचार कर समजून घे दोस्ता 
तुझं जग तूच उभार आता नवं ||१||

निसर्ग दोस्त तुझा दुश्मन कधी झाला 
महापूर होऊन मग तो गावात विसावला 
हद्द त्याची गिळंकृत तूच तर केली ना!
तुझ्या सारखा मोकळा श्वास घेऊ दे त्याला  ||२||

महामारी आली सांग तरी कशाने 
किती पशू संपवले अन्न म्हणून माणसाने 
तरीही मार्ग तुला थोडा काही ठेवला 
अस काय बिघडणार त्यांच्या जगण्याने ||३||

डोंगर जरा सैल झाले नेहमी प्रमाणे 
छोट्या टेकड्या सांभाळत होत्या पुर्वी 
त्यांचे अस्तित्व सांग कुठे गडप झाले 
जंगल झाडी त्यांची दाटी दाखव हिर्वी ||४||

तुझा विकास हवा तेवढा कर पण 
आमच्या जगण्याचं भान थोडं ठेव 
आरसा घेऊन आता तरी बघ स्वतःला 
तुझ्यातला जागा कर माणुसकीचा देव ||५||

विचार कर समजून घे दोस्ता 
विचार कर समजून घे दोस्ता 

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #समजून_घे_दोस्ता,  #पंडित_निंबाळकर 
#कविता