Nojoto: Largest Storytelling Platform

' आई' नावाचा चार्जर.. काही व्यक्ती आपल्यासाठी

' आई' नावाचा चार्जर..





काही व्यक्ती आपल्यासाठी चार्जरसारख्या असतात..  जेव्हा बॅटरी डाऊन होते. मनामध्ये काहीतरी बिघाड झालाय हे जाणवतं..  आतून तुटून पडल्यासारखं वाटतं.‌. आभाळात झेप घ्यायचीय पण उमेद खचलीय हे जाणवतं.. निगेटिव्हिटीचा व्हायरस वाऱ्यासारखा उधळत असतो.. अनावश्यक ऍप्सचा भरणा झालाय आणि आता सगळं काही हॅंग होणार असं वाटतं.. तेव्हा तेव्हा.. हा चार्जर  अगदी विश्वासानं धावत येतो.. अगदी न बोलवता..

याला नेटपॅकची गरज ना इलेक्ट्रिसिटीची.. या चार्जरची स्वतःचीच पॉवर कॅपॅसिटी प्रचंड आहे..  अगदी हार्ट टू हार्ट कनेक्ट होतो..  सगळ्या निगेटिव्हिटीचा व्हायरस निघून जातो आणि मनाचा फोन अगदी क्लीन होतो..  सगळे कॉन्टॅक्ट क्लिअर होतात, जे नको ते डिलीट होतं..  आपल्याला हवी ती पिक्चर्स पुन्हा एकदा स्वच्छ दिसायला लागतात.. आणि बॅटरी फुल्लचा मेसेज चेहऱ्यावर झळकू लागतो. 

क्यु आर स्कॅन करुन हल्ली सगळं ऑनलाईन मिळतं..  पण स्कॅन करुन आई नाही मिळत.! बाकी सगळं ऑनलाईन मिळेल पण ती आणि तीचं प्रेम ऑनलाईन नाही मिळणार..   ज्याच्याजवळ हा चार्जर आहे त्यांनी जीवापाड सांभाळा हं हा चार्जर.. एकदा हरवला ना.. की करोडो देऊनही नाही मिळणार परत.. 

तुमच्याकडे आहे का असा लाईफटाईम चार्जर??

©Archana Pol
  चार्जर
archanapol5687

Archana Pol

New Creator

चार्जर #जीवनअनुभव

126 Views