Nojoto: Largest Storytelling Platform
pandharer3900
  • 14Stories
  • 3Followers
  • 74Love
    0Views

Aishwarya Pradhane

  • Popular
  • Latest
  • Video
0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

🌝

आज पूनवचा चांद दुधात न्याहळत होता...
चांदणी त्यात त्याला भलतीच गोड            दिसली...
त्यांच्या प्रतिमेला पाहून कमाल हसत होता...
त्याची नजर भिडताच लाजून ती चमकली...
                    
...🔏सोनु ☺️ #कोजागिरी #kojagiri
0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

जगा आणि जगू द्या...   
                                                         भाग : ५ 
               
                 या गोष्टींमध्ये वापरावी बोलणारे जाणारे सांगणारे खूप असतात. आपण ते ऐकतो वाचतो, पाहतो पण परिस्थितीनुसार पटेल ते आणि पचेल तितकच स्वीकारतो..उदाहरणार्थ -'हेही दिवस जातील' ते वाक्य दुःखात दिलासा देतो मात्र सुखात मनात धडकी भरून जातो.         
          आपण चांगलं वागूनही आपल्याशी चांगले वर्तन होत नाही याला जबाबदार आपणच नसतो परिस्थिती, विचार, बुद्धी, घटना, पूर्वग्रह या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात .परंतु एखादा क्षण असा येतोच कि  सगळ संदर्भ जोडला जाऊन चूक लक्षात येते. मात्र वेळ निघून गेलेली असते किंवा उरलेली नसते .
अशावेळी आपला संयम आपली वैचारिक पातळी आपली कुवत ठरत असते. वयाने अनुभव येत नाही वाईट गोष्टींना येतो त्याचा वयाशी संबंध नसतो.
            या वागण्याने श्रीमंत गरिबीशी संबंध येतो का? सुधारले जाऊ शकते का? तर कष्टाने, बुद्धीने साध्य होईल पण सगळेच एक समान कधीच बनणार नाही कारण आयुष्य अपूर्ण गोष्टीत पूर्ण करण्यासाठी असतं. सगळ्यांच्या गरजा स्वतःवरच भागल्या तर अवलंबित्व येणार नाही. कोणीही कोणावरही विसंबून राहणार नाही. कृतज्ञता उरणार नाही. सगळे स्थिर झाल तर संपून जाईल.
    या सगळ्या गोष्टी रोजच्या जीवनात अशा एकमेकांत बांधलेले असतात ... 
हा गुंता सोडवण्यातच आयुष्य संपून जात ...
 मग जगा आणि जगु द्या एवढ लक्षात ठेवा. 
            
                                     ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने. #LastDay

9 Love

0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

जगा आणि जगू द्या... 
                                भाग : ४        
         आपण सर्वश्रेष्ठ असे समजल्यावर नको ती कृत्य नकळत घडतात.अगदी पावलागणिक समोरच्याचा अपमान करत सुटतो. कोणत्याही व्यक्तीला तुच्छच समजतो. एखाद्या वेळी खूप सातत्याने कष्ट केल्यावरही इच्छित फळ मिळत नाही तेव्हा आधार हवा असतो तो शोधतो. मनःशांती मिळावी म्हणून प्रयत्न करतो. यामुळे आपण या गोष्टीकडे वळतो. यामुळे मनातील विचार थांबतात कोणत्याही गोष्टीकडे एकटक पाहिलं किंवा एखादी गोष्ट करत राहिल्याने बाकी गोष्टींचा तात्पुरता विसर पडतो .त्यामुळे होम ,पूजापाठ ,देवी तो राया दैवीदोरा या सगळ्यामुळे आता यावर उपाय झाला म्हणून निश्चित असतो. विचार पुन्हा चालू झाल्याने समस्या उद्भवली असं वाटते परंतु समस्या संपलीच नव्हती त्याचे विचार मात्र थांबले होते. त्यावर उपाय करण्यासाठी ती संपवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीच केली गेली नव्हती.
             त्यातून मिळालेली शांती कृतीशील उपाय करण्यासाठी वापरायची असते. नेहमी सकारात्मक राहण्यासाठी, जमिनीवर राहण्यासाठी आपल्यावरती कोणीतरी आहे. जो आपल्याला नियंत्रित करतो त्याला आपण घाबरावं, सन्मान द्यावा, त्याच्या समोर झुकावं याचा अर्थ वाईट कृतीला घाबरून आवर बसावा, आपल्यातील चांगल्या गुणांचा सन्मान, करावा योग्य कृती करावी, योग्य ठिकाणी झुकावं ही भावना त्यामागे असते. जी कोणीही सांगत नाही . 
 काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत अलौकिक शक्ती असतात. याला तोड नाही परंतु स्वस्थ बसून अतिरेक करून काही मिळत नाही .ती शांती आपण पुढच्या भविष्यासाठी काय उपयोग ठरेल .
                           ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने . #LastDay
0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

जगा आणि जगू द्या .... 
                                        भाग :३        
             प्रत्येक व्यक्तीने नैतिकता जपली तर समूहाने जपल्यासारखे होईल आणि समूहाने जपले तर सगळा समाज आपोआप सुधारेल. यासाठी खूप काही शिकवण्याची गरज नाही. आपल्या सोबत जे वाईट घडू नये असं वाटतं ते इतरांसोबत वागू नये इतकेच शिकवले किंबहुना मनावर लहानपणापासूनच बिंबवले गेले की सहज होऊन जाते. 
           थोड नीट विचार करुन बघा. आपली कर्म इतरांवर आणि इतरांची कर्म आपल्यावर परिणाम करतातच याचा पूर्वजन्माशी संबंध लावला जातो याला भीती एक कारण असू शकते. वाईट करताना एक भीती नेहमी असते . काही गोष्टी मागे एखादी भीती दाखवली जाते . देवाची, कर्माची, पुनर्जन्माची ग्रहताऱ्यांची. ती भीती केव्हातरी संपते . मग तेव्हा काय ? हे योग्य की आयोग्य ? खरे की खोटे याचा विचार न करता असे नेमके का? याचा विचार करणे इष्ट ठरते. आपल्यावर कोणाचाही अंकुश नसेल .तर आपण मदमस्तक होतो ,माजाने ,गर्वाने ,अहंपणा ने वागायला लागतो.
                           ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने. #LastDay
0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

जगा आणि जगू द्या... 
                       भाग : २ 
              मला उलघडलेली ,आकलन झालेली काही वाचनात आलेली, काहि अनुभवलेली, काही पाहण्यात आलेली अशा गोष्टींचे तर्क 
आणि स्वतःच्या बुद्धीला पटलेले विचार स्पष्ट करून पाहताना लक्षात आलं . 
       समाज हा विशिष्ट गोष्टींसाठी अनुकूल असतो. मात्र वैयक्तिक जीवनात या समूहाचा कितपत प्रभाव किंवा शिरकावास आपण परवानगी दयावी. हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे .आजूबाजूला पावलागणिक घटना बदलत असते नवीन घटना जुन्या घटनेची जागा घेते. आणि वायफळ चर्चाना उधाण येते.  रिकामी लोकच हे करू शकतात .ज्यांना ध्येयप्राप्तीची जाण आहे, उद्देश ठरलेला आहे ,कष्ट करण्याची नित्य नवे साध्य करण्याची इच्छा आहे .असे लोक कृतीवर भर देतात चर्चा  हि या सगळ्या कामात मनोरंजनाचा भाग म्हणून सोडून देतात .
          आपली  कर्म आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी साठी कारणीभूत असतात हे अर्धसत्य आहे .आपल्या सोबत घडणाऱ्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी इतर सगळ्यांच्या कर्मावर कृतीवर अवलंबून असते .आणि आपली कर्म किंवा कृती इतर लोकांसाठी सार्थक किंवा घातक ठरत असते. 
उदाहरणार्थ मद्यपान , तंबाखू, गुठखा या गोष्टी खाऊ नये पिऊ नये असे सांगताना आपल्या कृतीतून तसे घडावे लागते. समोरच्याला न बोलता तो अनुकरणाने गोष्टी स्विकारतो मोठ्यांचा सन्मान करावा, त्यांना मदत करावी, योग्य वयात जबाबदारी घेऊन काम करावे हे सांगताना आपल्या आचरणातून तसे दिसावे लागते. 
                                   ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने #LastDay

2 Love

0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

जगा आणि जगू द्या...  
                                                 भाग :1
           व्यक्ती म्हणून आपण समाजात वाईट किंवा चांगले गोष्टीवर  पारखले जातो. मुळात मला वाटत पूर्णत: चांगल पूर्णतः वाईट अस नसतच कोणी... याचा संबंध कुटुंबातील संस्कारशी जोडला जातो .त्यापुढे आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा संबंध कर्माशी किंवा पुनर्जन्माची बांधला जातो. कुटुंबातील संस्कार व्यक्तीला समाजाच्या नियमांनुसार चांगला बनवण्यासाठी पुरेसे असतात का? समाजातला प्रत्येक जण चुकत असताना सामूहिकपणे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवले म्हणजे खरच तो दोषी आसतो का ?आपले कर्म नेहमी इतके वाईटच असतात का? पुनर्जन्म असला तर त्याची शिक्षा चालू जन्मात भोगताना एखादा  फल्याशबॅक का होत नाही? नंतर भलेही आठवू नये परंतु शिक्षेचा गुन्हा तरी तात्पुरता कळवा !
          एखाद्या वेळी लग्न मांडव ,घटिका  जवळ येताच वधू किंवा वराला मृत्यू येतो, बलात्कार होतात ,जन्मताच मृत्यू किंवा मृत् जन्माला येतो .या सगळ्या घटनेत पाप-पुण्याचा हिशोब लागतो का ? मग दोष नशिबाला दिला जातो. विधिलिखित सगळं असेल तर बसल्या ठिकाणी सगळं आयत का नाही मिळत? मग कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही .आणि दुसरीकडे फळा विना कर्म करत राहा अशा कित्येक गोष्टी मध्ये विचारांचं चक्र अडकून पडत .
           *ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने* #LastDay

4 Love

0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

श्रावणातील कानगोष्ट
काल वसुंधरा 
गगनास 
 बघ भेटली...
अश्रूरुपी दवबिंदू 
पाहून खात्री 
सहज पटली...
स्पर्शाने शहारुन 
सुंदर ती लाजली
 घरंगळले घुंगरू जशी 
नृत्यांगना थिरकली...
अशी एक 
कानगोष्ट 
मला श्रावणात कळली.
                           ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने.
सोलापूर श्रावण

श्रावण #poem

3 Love

0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

नैतिकतेच बाळकडू
                                                                        भाग ३ 
आपल्याला हे हव यासाठी मनाचा विचार न करणे आणि समोरच्या साठी हेच योग्य आहे हे आपणच ठरवणं या दोन्ही गोष्टी घातक ठरतात. निर्णय घेताना आपल्यासाठी घेते की समोरचा हितासाठी कि प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतोय, या सगळ्यात एखाद्याच्या मनाची अवस्था त्याच्या मनाची इच्छा आपण नाकारतोय याचा अर्थ त्यांच्या स्वातंत्र्याचा खून करतोय असा होतो..पालक इतर मुलांचे उदाहरण देत आपल्या पाल्यांना समजतात खडतर परिस्थिती असून तो किंवा ती उंचीवर पोहचले पण त्यावेळी असेही म्हणतात आमच्या बिकट परिस्थितीमुळे आम्ही शिकलो नाही याच विरोधाभासामुळे मुल महत्त्व देत नाही.
         मी माझ्या मुलांचा सांभाळ केला गरजा पुरवल्या, आजारात जागलो यामुळे आपल्या मुलांनी आपला आदर करावा? माझ्या मुलांना कोणती गोष्ट करायला त्यातून शिकायला किवा अनुभव घ्यायला मदत केली म्हणून त्यांनी माझा आदर करावा? का, मी माझ्या मुलांचा मित्र आहे मैत्रीण आहे यात पालकांना जास्त गर्व वाटावा .अशा वेळी मुलं कमी भरकटतात योग्य खाद्य पुरवलं म्हणजे केवळ पोषण नव्हे. मिळुन पुस्तकं ,वाचली खेळ, गेम चर्चा केली यात आनंद मिळतो. यासाठी वेळ नसतो. पण ज्यांच्यासाठी कमावतो त्यांच्यासोबत वेळ घालवतो. याचा व्यक्तीला खूप अभिमान असतो. त्याहीपेक्षा व्यक्ती समाधानी आणि निरोगी असतो. 
           यावरून लक्षात येतं एकमेकांना समजून घेऊन, परिस्थितीवर मात करायला सर्वांनी मिळून आर्थिक, भावनिक हातभार लावला तरच कुटुंबाला अर्थ येतो आणि समाज त्यामुळे सुधारतो.  नाही तर नुसताच देखावा. या पलीकडे व्यक्तीची नैतिकता वाढते; माणसाच्या माणूस म्हणून जगण्याला अर्थ येइल.
                                       ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने.
                                             सोलापूर #StreetNight
0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

नैतिकतेच बाळकडू                       
                                                                       भाग २ 
                  मुलांच्या ध्येय निवडीसाठी प्रयत्न नसतो झालाच, तर  आसक्ती येते किंवा काही ध्येय पालकांना कळत नसल्याने वळवली जातात . उदा: फुलपाखराला वेळे आधी कष्ट न देता आईने अंड्यातून बाहेर काढलं तर त्याला पंख फुटण्यासाठी कधीच बळकटी येणार नाही, आणि पक्षी कीटकाना ,वातावरणाला घाबरून अंड्याचा कवचातच ठेवलं तर सुरवंट गुदमरुन मरुन जाईन .
संकटाच्या भीतीने मुलींना रात्री घराबाहेर पडू नये असे म्हणणारे, प्रश्नांचा भडिमार करणारे ज्याच्यापासून भीती आहे,अशा मुलांना अडवत नाहीत. 
            लहानपणी बाळगुटी सोबत नैतिकता पण चाखवली गेली तर ,अडवणुकीचा प्रश्नच येत नाही कोणाच्याच ..प्रत्येक व्यक्तीने नैतिकता जपली तर समूहाने जपल्यासारखे होईल आणि समूहाने जपले तर सगळा समाज आपोआप सुधारेल.यासाठी खूप काही शिकवण्याची गरज नाही. आपल्या सोबत जे वाईट घडू नये असं वाटतं ते इतरांसोबत वागू नये इतकेच शिकवले किंबहुना मनावर कोरले गेले की सहज  होऊन जाते. आपण आपल मुल आहे म्हणून त्याच्या उद्धटपणा ला पडदा घातला तर तो माणस गृहित धरायला लागतो. बायको हक्काची म्हणून हात उचलणे शुल्लक वाटु लागते. तिचे स्वप्न हे त्यागासाठी असतात, आणि तिच आयुष्य राबण्यासाठीच असत अस खुप काहि .प्रत्येक पालकाला -फक्त आई-वडील नाही तर सांभाळणारा पोषण करणाऱ्या प्रत्येकाला ही हमी असणे आवश्यक आहे की आपल्या मुलासोबत कोणतीही मुलगी सुरक्षित आहे .आपल्या मुलीसोबत कोणाच्याही भावना सुरक्षित आहेत.
           
                                                   ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने 
                                                   सोलापूर. #StreetNight
0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

नैतिकतेच बाळकडू           भाग १ 
      आपल्या जीवनातील कुटुंब, समाज हे अविभाज्य भाग असतात .ज्या वातावरणात वाढतो त्या पद्धतीने गोष्टी अंगी करतो .कधी कधी कुटुंबाची परिस्थिती अनुकूल ठरते कधी प्रतिकूल काही गोष्टी मुद्दाम शिकवल्या जातात काही नकळत परिणाम करून जातात .
   व्यक्ती म्हणून आपण समाजात वाईट किंवा चांगले म्हणून पारखले जातो. याचा संबंध कुटुंबातील संस्कारशी जोडला जातो .त्यानंतर आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा संबंध कर्माशी किंवा पुनर्जन्माची बांधला जातो. कुटुंबातील संस्कार व्यक्तीला समाजाच्या नियमांनुसार चांगला बनवण्यासाठी पुरेसे असतात का? समाजातला प्रत्येक जण चुकत असताना सामूहिकपणे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवले म्हणजे खरच तो दोषी आसतो का ?
     कुटुंब प्राथमिक शिक्षण संस्था आहे .ज्यात नकळत मुलींनी असे वागावे असे वागू नये कटाक्षाने शिकवले जाते .तसे घडते की नाही याकडे देखील बारकाईने पाहिले जाते. परंतु मुलांकडे काही गोष्टींना कानाडोळा केला जातो .स्त्रियांबद्दल आदर सन्मान या गोष्टी खूप खोल शिकवल्या जात नाहीत .मुलांना बाहेर जाऊन खेळण्यासाठी प्रवृत्त केले जाते, पण मुलींना घर कामासाठी प्रशिक्षण वर्ग लावले जातात. बाहेरच्या भीतीने घरीच लपवून ठेवले जाते. तिच्या संरक्षणासाठी चे प्रशिक्षण वर्ग लावले जात नाहीत. हे झाल जुन्या विचारांच्या लोकांच. आधुनिक विचार करणारे पालक याबाबत दक्ष असतात परंतु ,सक्षमतेच्या मागून येणारा उद्धटपणा ,उद्दामपणा याला आवर घातला जात नाही .
                     ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने.
   सोलापूर. #StreetNight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile